सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवरील सर्व कर माफ करावे - विजय भालसिंग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवरील सर्व कर माफ करावे - विजय भालसिंग

 सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवरील सर्व कर माफ करावे - विजय भालसिंग

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करुन महागाई अटोक्यात आणण्याची मागणी
अहमदनगर ः महागाई अटोक्यात आनण्यासाठी त्वरीत राज्य व केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवरील सर्व कर माफ करुन वाढलेले इंधन दरवाढीचे भाव कमी करण्याच्या मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.  
देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दराने उच्चांक गाठला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे. तर दिवसंदिवस पिेट्रोल, डझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहे. परिणामी महागाई वाढत असून सर्वसामान्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले आहे. सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या संकटातून सावरत असताना महागाईच्या संकटात ढकळला जात आहे. क्रूड ऑइलचे भाव पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाढ होणे चुकीचे आहे. केंद्र शासनाने लावलेल्या जास्तीत जास्त टॅक्समुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन दरावाढीने महागाईचा भडका उडाला असून, सर्वच गोष्टी महाग होत चालल्या असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment