प्र. क्र. 1 हा विकसीत प्रभाग म्हणून ओळखला जाईल- संपत बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

प्र. क्र. 1 हा विकसीत प्रभाग म्हणून ओळखला जाईल- संपत बारस्कर

 प्र.क्र. 1 मधील देवपूजा कॉलनी गावडे मळा येथे बंद पाईपगटर कामाचा शुभारंभ

प्र. क्र. 1 हा विकसीत प्रभाग म्हणून ओळखला जाईल- संपत बारस्कर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रभागातील नागरिकांनी चारही नगरसेवकांवर विश्वास दाखवून निवडून दिले आहे. विकास कामातून विश्वास संपादन करण्यासाठी मोठया प्रमाणात प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोठी विकास कामे सुरू आहेत. प्रभाग क्र. 1 हा नव्याने विकसीत होणार भाग असून विस्तारानेही खूप मोठा आहे. दररोज नवनविन लोकवस्ती निर्माण होत आहे. त्यामुळे या भागामध्ये मुलभूत प्रश्नापासून काम करावे लागत आहे. यासाठी सर्वात आधी प्रभागातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बंद पाईप गटर कामे सुरू आहेत.     याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम सुरू आहेत. मा.आ.श्री.संग्राम जगताप व मनपाच्या माध्यमातून मोठा विकास निधी मिळाला असून पुढील काळात प्रभाग क्र. 1 हा विकसीत प्रभाग म्हणून ओळखला जाणार असल्याचे प्रतिपादन विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर यांनी केले आहे.
प्र.क्र. 1 मधील देवपूजा कॉलनी गावडे मळा येथे बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरूडे, नगरसेविका दिपालीताई बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, दत्तात्रय ढवळे, विजय कांबळे, निवृत्ती हिरे, नंदलाल तिवारी, रमाकांत पाठक, राधाबाई तांदळे, दत्तात्रय सांगळे, दत्ताभाऊ सातपुते, बाळासाहेब जाधव, ज्ञानदेव सांगळे, रूपेश मिश्रा, संदिप मंडलिक, नानाभाऊ बच्चाव, भारतीताई ढवळे, श्रीमती प्रतिक्षाताई इरशीत आदी उपस्थित होते.
   डॉ. सागर बोरूडे म्हणाले की, प्रभागाच्या विकास कामा बरोबरच पुढील काळामध्ये आम्ही चारही नगरसेवक सकारात्मक दृष्टिकोनातून नागरिकांना बरोबर घेवून सामाजिक उपक्रम राबविणार आहोत पर्यावरणाच्या दृष्टिने प्रभागामध्ये झाडे लावण्यासाठी एक समिती निर्माण करून वृक्षारोपन करून न थांबता त्याचे संवर्धन करणार आहोत. येत्या पावसाळयामध्ये प्रभागामध्ये वृक्ष दत्तक योजने बरोबर मनपाचे ओपन स्पेस व रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपन करणार असल्याचे ते म्हणाले. नगरसेविका मा.सौ.दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की, प्रभागातील महिलांचे संघटन करून शासनाच्या विविध योजना महिलां मार्फत प्रभागामध्ये पोहविण्याचे काम करणार आहे. महिलांसाठी सांस्कृतिक भवन उभे करावयाचे असून मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्या माध्यमातून लवकर निधी उपलब्ध होणार आहे. ओपन स्पेसचे सुशोभिकरणाचे काम ही मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही चारही नगरसेवक प्रभागाच्या विकासासाठी कटीबध्द आहोत असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here