करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा

 करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक दुकानदाराने योगदान द्यावे : ईश्वर बोरा

साजन सजनी रेडिमेड दालनात ग्राहकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वितरण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  नगर जिल्ह्यात तसेच शहरात करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने वाढत आहे. आताच्या परिस्थितीत लॉकडाऊन अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे व आपल्या ग्राहकांमध्येही तशी जागृती करणे आवश्यक आहे. साजन सजनी दालनाने आपल्या ग्राहकांना मोफत मास्क व सॅनिटायझर देण्याचा उपक्रम सुरु करून करोना विरुध्दच्या लढाईत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रत्येक दुकानदाराने अशीच काळजी घेतल्यास करोनाविरुध्दच्या लढाईला मोठं बळ येईल, असा विश्वास सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन इश्वर बोरा यांनी केले आहे.
   नगरच्या नवीपेठेतील साजन सजनी रेडिमेड दालनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे पाऊल उचलले आहे. याठिकाणी दुकानात येणार्या प्रत्येक ग्राहकाला मास्क व सॅनिटायझर देण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ करताना बोरा बोलत होते.यावेळी डॉ.सचिन भंडारी, साजन सजनीचे संचालक शेखर भंडारी, जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेके्रटरी हेमंत मुथा, सत्येन मुथा आदींसह ग्राहक उपस्थित होते. हेमंत मुथा म्हणाले की, सध्या करोनाला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून बाजारातील गर्दी लक्षात घेवून दुकानदारांनाही नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. त्याला साजन सजनी दालनाने अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक दुकानदाराने स्वत:बरोबरच ग्राहकांचीही काळजी घेतली पाहिजे. शेखर भंडारी म्हणाले की, प्रशासनाकडून करोना प्रतिबंधासाठी चांगली नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. महामारीला रोखण्यासाठी सर्वांनीच नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment