सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केल्यास अपघात टळतील- अरविंद पारगांवकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केल्यास अपघात टळतील- अरविंद पारगांवकर

 श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा.लि. मध्ये सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केल्यास अपघात टळतील- अरविंद पारगांवकर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आजच्या दिवशी मी सत्य निष्ठापूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी स्वत:ला सुरक्षा स्वास्थ्य व पर्यावरण उत्तम करण्याचा कार्यात समर्पित करेल. नियम, उपनियम, कार्यपद्धती पाळेल व अपघात टाळण्यासाठी माझ्या विचारांचा व कार्यपद्धतीचा विकास करेल. कारण अपघात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला दुर्बल बनवितात व हेच अपघात शारीरिक हानी किंवा मृत्यू, किंवा शरीरस्वास्थ्य किंवा संपतीचा नाश, हनिकारक पर्यावरण व सामाजिक त्रास याला कारणीभुत ठरतात, यामुळे मी स्वत: माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, समाजाच्यासाठी, राष्ट्रासाठी, कारखान्यासाठी व माझ्या सर्व बांधवांसाठी अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून यथाशक्ती प्रयत्न करेल. आज 50 वा राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा औद्योगिक वसाहतीतील श्नाइडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लि. येथे प्रारंभ झाला. कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगांवकर यांच्या हस्ते सुरक्षिततेचा झेंडा फडकावून या सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वरील सुरक्षितता पाळण्याविषयक गंभीरतापूर्वक शपथ घेतली. याप्रसंगी कंपनीचे जनरल मॅनेजर (गुणवत्ता) संदिप महाजन, सुरक्षा विभागाचे शैलेंद्र भालेकर, योगेश ओझा, चंद्रकांत भंडारी व्यासपीठावर उपस्थित होते.
   यंदाच्या वर्षीच सुरक्षिततेचे घोषवाक्य ‘अपघातातून शिका व सुरक्षितता वाढीस लावून आपले आयुष्य सुरक्षित करा’ ही आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैलेंद्र भालेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. 4 ते 11 मार्च पर्यंत सुरक्षा सप्ताहात होणार्या सुरक्षिततेविषयीची सविस्तर माहिती दिली.
   अरविंद पारगांवकर म्हणाले, सुरक्षितता मग ती कोणत्याही बाबीची असो ही सर्वांनी सर्वत्र अंगिकरणे अतिशय गरजेचे आहे. सध्याचे युग व गतीमान तसेच नवनवीन आधुनिक यांत्रिककरणाचे असल्याने सर्वांनीच सुरक्षिततेची  उपकरणे काम करतांना वापरावीत, जेणे करुन अपघातांचे प्रमाण त्यामुळे कमी होईल. संदिप महाजन यांनी औद्योगिक सुरक्षिततेविषयी काही उदाहरणे देऊन समयोसूचित भाषण करुन आपले विचार मांडले. व सुरक्षा विषयक कंपनीमध्ये काम करणार्या सुरक्षा कमिटीचे अभिनंदन केले व सुरक्षिततेविषयी आपण सातत्याने सर्वांची काळजी घेत रहावे दुर्लक्षित करु नये, असे सांगितले.
   याप्रसंगी सुरक्षिततेविषयक  सर्वश्री महेश चांडक, अविनाश मांडे, अविनाश कोल्हटकर, मानवसंसाधन विभागाचे प्रमुख श्रीकांत गाडे, योगेश ओझा, कामगार युनियनचे किरण देशमुख यांनी सुरक्षिततेविषयक आपले विचार व्यक्त केले. या सुरक्षा सप्ताहानिमित्त कंपनीमध्ये केमिकल हाताळणे याचे प्रशिक्षण, बोटांची काळजी घेणे, सुरक्षिततेविषयी व्याख्याने, स्पॉर्ट हाजार्ड, सुरक्षा नियमाविषयी निबंध स्पर्धा, चालता बोलता स्पर्धा, पोस्टर, प्राथमिक उपचार, अग्निशमन प्रात्यक्षिके व सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह यशस्वीतेसाठी संजय भुजबळ, ताराचंद ठोकळ, दत्तात्रय बोरुडे, सुखदेव निमसे, ईश्वर हांडे, चैतन्य खानवेलकर, श्री.भावसार आदि प्रयत्नशिल आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शैलेंद्र भालेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment