नागेबाबा पतसंस्थेच्या पुस्तकांच्या प्रदर्शनास सुरवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

नागेबाबा पतसंस्थेच्या पुस्तकांच्या प्रदर्शनास सुरवात

 महिला दिनानिमित्त साहित्य प्रेमींना अनोखी भेट

नागेबाबा पतसंस्थेच्या पुस्तकांच्या प्रदर्शनास सुरवात

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः संत नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य प्रेमींसाठी अत्यल्प दरात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील एक महिना चालणारे हे प्रदर्शन  सावेडीच्या माउली सभागृहा समोरील नागेबाबा मल्टिस्टेट संस्थेच्या कार्यालयाच्या जागेत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात साहित्य प्रेमींना पुस्तक खरेदीवर भरमसाठ सूट देण्यात आली असून सर्वप्रकारचे मराठी व इंग्रजी पुस्तके केवळ 70 रुपयात, एतेहासिक पुस्तके 200 तर कायदे विषयक पुस्तके केवळ 300 रुपयांमध्ये मिळणार आहेत. तसेच 6600 रुपयांचे पुस्तके केवळ 1600 रुपयात मिळणार आहेत. नागरिकांमध्ये पुस्तके वाचनाची कमी झालेली सवय पुन्हा रुजावी यासाठी नागेबाबा परिवार जागृती करत आहे. महागाईच्या दिवसात वाचकांना अत्यल्प दरात सर्वप्रकारचे पुस्तेके उपलब्ध व्हावीत यासाठी कोल्हापूरच्या अजब प्रकाशनच्या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी करत आहोत, अशी माहिती नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी दिली.
   या प्रदर्शनाचे उद्घाटन डिझाईन आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी चेअरमन कडूभाऊ काळे, संजय मनवेलीकर, व्यवस्थापक सीए अमित फिरोदिया, अजब प्रकाशनचे मनोज साळूंके, प्रजापती ब्रम्हकुमारीच्या बीके विजया उपस्थित होते.
    यावेळी ज्ञानेश शिंदे म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शन भरवण्याचा स्तुत्य उपक्रम नागेबाबा परिवाराने राबवला आहे. या उपक्रमा मुळे महिलादिन केवळ एक दिवस साजरा न होता महिनाभर साजरा होणार आहे. कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा संस्थेने चांगल्या बँकिंग बरोबरच चांगले विचार देण्यावर भर देत वाचन संस्कृतीला चालना दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा बारगजे यांनी केले, आभार अनिल कदम यांनी मानले.

No comments:

Post a Comment