दृष्टीची ही अलौकिक भेट तरुण पिढीसाठी वरदान ः सौ. घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

दृष्टीची ही अलौकिक भेट तरुण पिढीसाठी वरदान ः सौ. घुले

 दृष्टीची ही अलौकिक भेट तरुण पिढीसाठी वरदान ः सौ. घुले

महिला दिनानिमित्त आयोजित विवाह दृष्टीभेट नेत्रशिबिराचा शानदार शुभारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः येथील साई सूर्य नेत्रसेवा द्वारे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या ही वर्षी खास उपवर मुली व महिलांसाठी विवाहदृष्टी भेट नेत्रशिबीराचे आयोजन केले जाते. महिला दिनानिमित्त आयोजित सदर नेत्रशिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्या प्रसंगी साई सूर्य नेत्रसेवाच्या संचालक डॉ. सौ. सुधा कांकरिया व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते.
   सौ. घुले म्हणाल्या की खास महिलांसाठी हे शिबीर आहे. दरवर्षी अशा शिबीराचे आयोजन केले जाते. आज पर्यंत हजारो युवती महिलांना ही दृष्टीची अलौकिक भेट प्राप् झाली आहे. हे महत्वपूर्ण कार्य साई सूर्य नेत्रसेवा करीत आहे. डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया यांचे मी अभिनंदन करते. महिलांना आता आरक्षण ही मिळत आहे. विविध क्षेत्रात त्या आपले कार्य कृर्तत्व सिध्द करीत आहेत. तरीही महिला विषयीचे अत्याचार, स्त्रीभ्रुणहत्या होतच आहेत. या सामाजिक कार्यासाठीही डॉ. सुधाताईंचे तीन तपाचे योगदान आहे. समाजासाठी त्या आदर्श कार्य करीत आहेत.त्यांचे मी कौतुक करते.
   डॉ. सुधा कांकरिया यांनी सुरूवातीस स्वागत केले. दृष्टीदोष असल्यामुळे चष्मा लागतो व उपवर मुलींसाठी लग्नातील तो अडथळा ठरतो. तो अडथळा दूर होऊन त्यांचे जीवन सुकर व आनंदी व्हावे यासाठी साई सूर्य नेत्रसेवा गेल्या 30 वर्षापासून झटत आहे. या माध्यमातुन तरूणींना दिलासा मिळत आहे याचे समाधान वाटते.
   डॉ. प्रकाश कांकरिया यांनी नेत्रपेढी व नेत्रसेवा बाबतच्या विविध टप्याची व ऑपरेशनची माहिती दिली. राज्यशासनाचा मिळालेला पुरस्कार ही पाठीवरील थाप असुन अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देते असे म्हणाले.
   या शिबीराचा लाभ घेण्यासाठी अनेक नेत्ररूग्णांनी नांवनोंदणी केली आहे. परंतू कोरोना विषयीचे सर्व नियम पाळून गर्दी न करता रोज काही थोडया व्यक्तींचेच ऑपरेशन होणार आहेत सदर शिबीर म्हणून आठ दिवस चालेल अस ही डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगितले. शेवटी व्यवस्थापक रामदास केदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here