‘स्नेहबंध’तर्फे ज्येष्ठ व वंचित नागरिकांसाठी दंततपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

‘स्नेहबंध’तर्फे ज्येष्ठ व वंचित नागरिकांसाठी दंततपासणी शिबीर

 ‘स्नेहबंध’तर्फे ज्येष्ठ व वंचित नागरिकांसाठी दंततपासणी शिबीर

जेष्ठांनी आरोग्य टिकवणे गरजेचे
दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे गरजेचे आहे. जेष्ठांनी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः
स्नेहबंध फोंडेशनच्या वतीने भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरात राहणारे ज्येष्ठ व वंचित नागरिकांसाठी दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात व रुग्णांना औषध वाटप करून टुथब्रश व टुथपेस्ट वाटप करण्यात आले.

   साई डेंटल क्लिनिक चे डॉ. अतुल मडावी यांनी रुग्णांची दंत तपाासणी केली. यावेळी स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, चुनीलाल झंवर, अभिजीत ढाकणे, प्रसाद कुलकर्णी, हेमंत ढाकेफळकर, सुभाष त्रिमुखे आदी उपस्थित होते.
   दातांची काळजी कशी घ्यावी, दात व्यवस्थित राहतील याबाबत डॉ. मडावी यांनी मार्गदर्शन केले. दातांचे काही आजार आढळल्यास ते सवलतीच्या दरात करण्यात येतील. त्यात दातात सिमेंट भरणे, दातांचा डिजिटल एक्सरे, दात सरळ करणे, ब्लिचिंग करणे, पुढे आलेले दात मागे घेणे, आदी उपचार सवलतीच्या दरात करण्यात येतील, असे डॉ. मडावी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment