सर्वसामान्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदोदीत प्रयत्नशील : उमेश परहर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

सर्वसामान्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदोदीत प्रयत्नशील : उमेश परहर

 सर्वसामान्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदोदीत प्रयत्नशील : उमेश परहर

खंडाळा येथे रस्ता काँक्रिटिकरण शुभारंभ व विद्यार्थीनींना सायकल वाटप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विविध योजनांचे लाभ मिळवून देणे व विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. संदेश कार्ले हे अतिशय अभ्यासू सदस्य असून कायम लोकांमध्ये असल्याने त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. विकासकामांसाठी पाठपुरावा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. जास्तीत जास्त योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी ते कायम आग्रही असतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी केले.
   जि.प.सदस्य संदेश कार्ले यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील खंडाळा येथे बनसोडे वस्तीच्या जोड रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच सभापती परहर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण व महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास जि.प.सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, सरपंच मोहन सुपेकर, उपसरपंच दीपाली लोटके, सुनिता लोटके, सुजाता कार्ले, ग्रामसेविका लता सागावकर, ज्योती लोटके, बाबा दरेकर, विकी बनसोडे, रोहित बनसोडे, सिमोन पाचारणे आदी उपस्थित होते.
   संदेश कार्ले म्हणाले की, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणत गावागावात मूलभूत समस्यांची सोडवणूक करण्यावर आपला भर असतो. यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment