सभापती म्हणूनही धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील - डॉ. शकिल फातेमा शेख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

सभापती म्हणूनही धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील - डॉ. शकिल फातेमा शेख

 अविनाश घुले यांचा जिल्हा महिला विकास मंडळाच्यावतीने सत्कार

सभापती म्हणूनही धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील - डॉ. शकिल फातेमा शेख

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः घुले परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेला आहे. स्व.शंकरराव घुले यांचे विविध क्षेत्रातील योगदान हे विसरु शकत नाही. तोच वारसा अविनाश घुले चालवित आहेत. हमाल पंचायत, प्रतिष्ठान, मंडळ याबरोबर नगरसेवक म्हणूनही ते सर्वांच्या मदतीसाठी धावून येत असतात. त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी झालेली निवड सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. सभापती म्हणूनही ते धडक निर्णय घेऊन नगर शहराचा विकास साधतील यात शंका नाही. नुकतीच सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला ‘पाणी’ यासाठी त्यांनी तातडीने बैठक घेऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेले प्रयत्न हे एक उदाहरण आहे. यापुढील काळातही ते असेच चांगले निर्णय घेऊन नगर शहराला विकसित करतील, असा विश्वास अहमदनगर जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकिल फातेमा शेख यांनी व्यक्त केला.
मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा महिला विकास मंडळाच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन डॉ.शकिल फातेमा शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिव रफिया शेख, खजिनदार जाहिदा शेख, यास्मीन शेख, उपाध्यक्षा सखुबाई संदुपटला आदि उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना नगरसेवक अविनाश घुले म्हणाले, समाजसेवेचा वारसा घरातून मिळालेला असल्याने व मित्र परिवाराच्या सहकार्याने आपणास विविध पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासात सातत्यातर आहे, परंतु आता स्थायी समितीचा सभापती म्हणून नगर शहराच्या प्रश्नांच्या मुळाशी जावून ते सोडविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या मुलभुत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत.

No comments:

Post a Comment