जय आनंद मंडळाच्या वतीने ‘महिला सुरक्षितता व सक्षमीकरण’ विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

जय आनंद मंडळाच्या वतीने ‘महिला सुरक्षितता व सक्षमीकरण’ विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

 जय आनंद मंडळाच्या वतीने ‘महिला सुरक्षितता व सक्षमीकरण’ विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने युवती, महिलांसाठी ’महिला सुरक्षितता व सक्षमीकरण’ याविषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आज विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. पण घरात तसेच घराबाहेरही मुली, महिलांवर अन्याय, अत्याचार होतो हे अनेक घटनांतून समोर येत असते. महिला सक्षमीकरणाबाबतही सरकार अनेक योजना आणत असते. या योजनांचा लाभ महिलांना खरेच होतो का? अशा विविध मुद्द्यांना निबंधातून स्पर्श करणं अपेक्षित आहे, अशी माहिती जय आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता गुंदेचा यांनी दिली.
   सेक्रेटरी स्नेहल कोठारी यांनी सांगितले की,  जय आनंद मंडळातर्फे नेहमीच समाजातील ज्वलंत विषयावर मंथन घडवले जाते. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील फक्त महिलांसाठी खुली आहे. निबंध कमाल 750 शब्दात सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेला असावा. प्रथम तीन उत्कृष्ट निबंधांसाठी आकर्षक पारितोषिक देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकही असणार आहे. स्पर्धेचा निकाल विजेत्यांना दूरध्वनीवरून कळवला जाईल. निबंधावर स्पर्धकाने संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपले निबंध दि.12 मार्च पर्यंत रोहित कॉस्मेटिक्स, नवी पेठ येथे प्रत्यक्ष जमा करावेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here