सरस्वती हॉस्पिटलचा देशपातळीवरील ‘एनएबीएच’ मानांकनाने गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

सरस्वती हॉस्पिटलचा देशपातळीवरील ‘एनएबीएच’ मानांकनाने गौरव

 सरस्वती हॉस्पिटलचा देशपातळीवरील ‘एनएबीएच’ मानांकनाने गौरव 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः रूग्णांना उच्च दर्जाच्या सेवेची हमी देणारे नॅशनल ऍक्रेडीशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ऍण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) या संस्थेचे मानांकन नगरमधील माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे. दर्जेदार आरोग्य सेवेचे सर्व निकष पूर्ण केल्याने सरस्वती हॉस्पिटलच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. चार वर्षांच्या बांधिलकीच्या रूग्णसेवेचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल जाधव व डॉ.प्राजक्ता जाधव यांनी दिली. एनएबीएच संस्था देशपातळीवरील संस्था असून गुणवत्तेचे निकष पूर्ण करणार्या हॉस्पिटल्सना संस्थेतर्फे मानांकन दिले जाते. सरस्वती हॉस्पिटल मॅटर्निटी होम ऍण्ड ऍडव्हान्सड् लॅप्रोस्कोपी सेंटर एप्रिल 2017 मध्ये रूग्णसेवेत रूजू झाले. सुरुवातीपासून रूग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, वेदन विरहित प्रसूती, किशोरवयीन समुपदेशन, लग्नापूर्वी व गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन सल्ला केंद्र, अनियमित पाळी व पीसीओडी उपचार, मेनोपॉज मार्गदर्शन तसेच वंध्यत्व निवारण आदी उपचार सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया, टाका विरहीत पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, शासनमान्य कुटुंब कल्याण व गर्भपात केंद्र, लैंगिक समस्या मार्गदर्शन, कर्करोग निदान व उपचार, सोनोग्राफी व कलर डॉपलर सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. नगरमधील पहिलेच मिंडरे कंपनीचे सोनोग्राफी मशिन सरस्वती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

आई व बाळाची परिपूर्ण काळजी घेत आरोग्यसेवेत बांधिलकीचा नवा मापदंड निर्माण करण्यात हॉस्पिटलला यश आले आहे. डॉ.जाधव यांनी आरोग्य क्षेत्रातील सेवाकार्य हॉस्पिटलपुरतेच मर्यादित न ठेवता आरोग्यविषयक जनजागृतीसाठीही ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. हॉस्पिटलमार्फत चार वर्षात महिला, युवतींना आत्मविश्वास देणारे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गरोदर मातांसाठी नगर जिल्ह्यातील पहिला रॅम्प वॉक कार्यक्रम हॉस्पिटलने आयोजित केला होता. दिल ये जिद्दी है सारख्या कार्यक्रमातून महिलांमधील सुप्त गुणांना चालना देण्यात आली. याशिवाय विविध शाळा, कॉलेज, महिला संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून डॉ.जाधव आरोग्याचा व महिला सक्षमीकरणाचा मंत्र देत असतात. हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येते. एन.ए.बी.एच.मानांकनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित स्टाफ, हॉस्पिटलमधील मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात आली. आधुनिक वैद्यक शास्त्राला अनुभवाची आणि सेवाभावाची जोड देत परिपूर्ण रूग्णसेवा देण्यावर हॉस्पिटलने कायम भर दिला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत प्रतिष्ठेचे मानांकन हॉस्पिटलला मिळाले आहे. या यशामध्ये हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा असल्याची भावना डॉ.जाधव यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment