प्राथमिक शिक्षक बँकेला बुडीत कर्जामध्ये ढकलण्याचा विद्यमान संचालकांचा डाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

प्राथमिक शिक्षक बँकेला बुडीत कर्जामध्ये ढकलण्याचा विद्यमान संचालकांचा डाव

 प्राथमिक शिक्षक बँकेला बुडीत कर्जामध्ये ढकलण्याचा विद्यमान संचालकांचा डाव

ऐक्य मंडळाचा आरोप राजेंद्र निमसे यांचा आरोप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने 28 मार्च 2021 च्या सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षक बँकेचे क्षेत्र हे राज्यभर करण्याचा ठराव मंजूरीस आणला आहे . मात्र बँकेचे क्षेत्र हे राज्यभर करून या बँकेला बुडीत कर्जामध्ये ढकलण्याचा डाव  विद्यमान संचालक मंडळाने आखला असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले यांनी केला आहे .
   बँकेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी निवेदन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे . निवेदनात म्हटले आहे की शिक्षक बँकेच्या कर्जाच्या वसुलीबाबत स्वतःच्याच अहमदनगर जिल्ह्यात सुसूत्रता नाही . अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये या । जिल्हा परिषदेने  शिक्षक बँकेच्या कर्जाची वसुली करू नये असा ठराव संमत करण्यात आला आहे .या कर्जवसुलीला अहमदनगर जिल्ह्यातच अडथळा निर्माण झालेला आहे .असे असताना देखील राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये असे कर्जवसुली करार केले तरी ते करार कितपत पाळले जातील याची अजिबात शाश्वती नाही . म्हणजेच संबंधित शिक्षक कर्जदाराच्या कर्ज वसुलीला अटकाव येऊन कर्ज वसुली होणार नाही . परिणामी शिक्षक  बँकेचे बुडीत कर्ज वाढत जाऊन त्याचा भार शिक्षक सभासदांवर येऊन बँकेचा एनपीए वाढेल . या वाढलेल्या एनपीए मुळे शिक्षक बँकेची समाजात असलेली पत हळूहळू कमी कमी होत जाईल . शिक्षक बँकेमध्ये ठेवी ठेवणार्‍या ठेवीदारांचा विश्वास व ठेवी ठेवण्याचा ओघही हळूहळू कमी होईल . परिणामी ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शिक्षकांची कायम ठेव वाढवून सभासदांच्या खिशाला कात्री लागेल .तसेच प्रत्येक जिल्ह्यात करार करण्यासाठी  चेअरमन , व्हाईस चेअरमन , त्यांचे काही संचालक व बँकेचे अधिकारी यांना संपूर्ण महाराष्ट्रभर संबंधित जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कर्जवसुलीचा करार करण्यासाठी प्रचंड प्रवास करावा लागेल .शिक्षक बँकेकडे स्वतःचे वाहन सुद्धा नाही . यामुळे भाडयाचे वाहन घेऊन होणार्‍या प्रवासभत्या पोटी बँकेला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत .एकीकडे बॅकेचे उत्पन्न वाढवण्यापोटी खटाटोप करायचा आणि केवळ प्रवासासाठीच लाखो रुपये अनाठायी खर्च होणार आहेत.
   यासाठी प्राथमिक शिक्षक बँकेने प्रथम इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम (ईसीएस ) प्रणाली अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कर्जवसुली साठी स्विकारावी . ही प्रणालीअहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाल्यास राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शिक्षक हा केवळ अहमदनगर येथे येऊन तो कर्ज घेणे बाबतची प्रक्रिया पूर्ण करून घेऊन शकतो . या ईसीएस प्रणालीमुळे कर्जदाराचे कर्ज वसुली हप्ता हा दरमहा ठरलेल्या तारखेला बँकेला प्राप्त होईल . यामुळे बँकेचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन ,बँकेचे अधिकारी यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कर्ज वसुली करार करण्यासाठी जाण्याची गरजच नाही . म्हणून हा ठराव सध्या मंजूर न करता संस्थगित ठेवण्यात येऊन  शिक्षक बँकेची ईसीएस प्रणाली पूर्ण झाल्यावर हा ठराव पूनश्च पुनर्जिवीत करून तो यशस्वीपणे लागू करण्यात यावा अशी मागणी ऐक्य मंडळाने केली आहे .
तसेच सर्वसाधारण सभेमध्ये या संचालक मंडळाच्या रूपये 1 कोटी शताब्दी महोत्सव हिशोब, घडयाळ खरेदी, शाखा दुरुस्ती आदीच्या गैरकारभारावर ऐक्य मंडळ स्वतंत्रपणे विरोध करणार आहे . राज्य कार्यक्षेत्र या ठरावाला विरोध असतानाही तो मंजूर केल्यास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळ संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेलअसा इशारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे ,जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, ऐक्य मंडळाचे जिल्हासरचिटणीस सुरेश नवले, ऐक्य मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर,अखिल डीसीपीएसचे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव ,अखिल पदवीधरचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, प्रदीप चक्रनारायण, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, विलास लवांडे, संजय सोनवणे,मधुकर थोरात, प्रकाश पटेकर, नंदू गायकवाड ,  पांडुरंग देवकर, प्रवीण शेळके, अशोक दहिफळे, रविंद्र अनाप, शिवाजी नरवडे,संभाजी तुपेरे, बथुवेल हिवाळे, शहाजी जरे, संदीप कडू, राजेंद्र देशमुख, सुखदेव डेंगळे,दिलीप दहिफळे , लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, दत्तात्रय बर्गे,प्रकाश कदम, जनार्दन काळे ,बाळासाहेब जाधव, शिवाजी माने, नवीनकुमार वागजकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, जिल्हा उपाध्यक्ष अनिता उदबत्ते,बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे ,उज्वला घोरपडे सुरेखा बळीद ,मनीषा क्षेत्रे आदींनी दिला आहे . अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

No comments:

Post a Comment