सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दांजली

 सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रध्दांजली


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  सर्वसामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा दिलीप गांधी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जनसामान्यांप्रती कायम तळमळ असलेल्या दिलीप गांधी यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून ठसा उमटवणारे काम केले. सार्वजनिक जीवनात वावरताना आपली बांधिलकी कायम विचारांशी व जनतेशी असली पाहिजे अशी शिकवण त्यांनी दिली. जैन ओसवाल पतसंस्थेचे सन्माननीय सभासद म्हणून ते कायम संस्थेच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचे. त्यांच्या निधनाने एक सच्चा लोकनेता हरपला आहे, अशी भावना सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा यांनी व्यक्त केल्या.
    सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना नुकतीच श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. चेअरमन ईश्वर बोरा व ज्येष्ठ संचालक शांतीलाल गुगळे यांनी दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चेअरमन बोरा बोलत होते. याप्रसंगी व्हा.चेअरमन किरण शिंगी, संचालक समीर बोरा, संतोष गांधी, शैलेश गांधी, शांतीलाल गुगळे, पंडितराव खरपुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भंडारी, मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी मनोज लुणिया, रोहित कटारिया आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here