मनपा गाळे भाड्यात भरमसाठ वाढ... गाळेधारक भाडे भरण्यास असमर्थ.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

मनपा गाळे भाड्यात भरमसाठ वाढ... गाळेधारक भाडे भरण्यास असमर्थ..

 मनपा गाळे भाड्यात भरमसाठ वाढ... गाळेधारक भाडे भरण्यास असमर्थ..

7-8 महिन्यांचे गाळे भाडे माफ करावे- राजेंद्र दळवी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 25 ते 30 वर्षापासून मनपाच्या गाळ्यात व्यवसाय करणार्‍या गाळेधारकांनी गाळ्याचे भाडे कमी करून 7 ते 8 महिन्याचे गाळे भाडे माफ करावे अशी मागणी मनपा आयुक्तांकडे शिवसेना नगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
   मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दळवी यांनी म्हटले आहे की, अहमदनगर महापालिकेची जवळपास 840 गाळे असून आम्ही गाळेधारक त्या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय करतो. गेली 25 ते 30 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करतो व वेळोवेळी महापालिकेची भाडे भरतो. परंतु गेली 6 ते 7 वर्षापासून आमच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होऊन साधारण 300 ते 400 टक्के भाडेवाढ झालेली आहे. त्या संदर्भात वेळोवेळी पालिका प्रशासन व महापौर यांची चर्चा झाली . तसेच या संदर्भात महासभा सुद्धा झाली. परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. वेळोवेळी निवेदने दिली, मागील वर्षी मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब, यांना सुद्धा निवेदन दिले होते, परंतु कविडच्या आजारामुळे संपूर्ण वर्ष त्यावर चर्चा झाली नाही. मा. आयुक्त साहेबांना सर्व गाळेधारकांची विनंती आहे की, आपण या प्रश्नत स्वतः लक्ष घालावे व त्यावर तोडगा काढावा. त्याचप्रमाणे सध्या सर्व महा नगर पालिकेची वसुली चालू आहे. गेल्या वर्षभर कविड आजारामुळे व्यवसाय बंद होते, त्यामुळे आम्ही गाळेधारक भाडे भरण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या भाड्यापैकी 7 ते 8 महिन्याचे भाडे आम्हाला माफ करावे व जे भाडे भरवयाचे आहेत ते जुन्या भाडे प्रमाणे वसूल करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment