प्रभाग 11 मधील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

प्रभाग 11 मधील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

 प्रभाग 11 मधील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 11 मधील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक नज्जुपैलवान यांनी आमदार संग्राम जगताप आणि स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचे विषेश आभार मानले.
   यावेळी सभापती अविनाश घुले, भा कुरेशी, नगरसेवक विनोद कदम, माजी नगरसेविक नूरजहाँ शेख, ऐजाज सय्यद, मुन्ना सय्यद, रबनवाज जागीरदार, बबलू आव्हाड, तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना अविनाश घुले म्हणाले की, भविष्यात शहराचा विकास व्हावा यासाठी विविध प्रभागामध्ये नियोजीत असलेली कामे मार्गी लावण्यावर भर आहे. नागरीकांना पाणी, विज यासह विविध प्रश्न आहेत. यावर लक्ष देऊन पुर्ण करण्यासाठी काम करणार आहोत. शहराचा स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांम कसा येईल यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले तर आपले शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून पुढे येईल.शहरामध्ये पर्याटण क्षेत्राला वाव आहे. यासाठी पिंपळगाव माळवी येथील जागेवर नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. येथे पर्याटनासाठी काही चालना देण्यासाठी आपला प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. झेंडीगेट येथील हॉटेल मीरा पासून तर सरोदे घर ते एलियाज शेख याच्या घरा पर्यत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी घुले हे बोलत होते.

No comments:

Post a Comment