जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खुली चौकशी समिती.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खुली चौकशी समिती..

 जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खुली चौकशी समिती..

जिल्हास्तरीय तक्रारींसंदर्भात उद्या आढावा बैठक !
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अभियान कालावधीत झालेल्या मृद व जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली खुली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत अहमदनगर जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारीचा आढावा व तक्रारदारांना समक्ष निवेदन मांडण्यासाठी दिनांक 3 मार्च, 2021 रोजी सकाळी 11-30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
   जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी सादर केलेल्या तक्रारी संदर्भात तक्रारदारांनी आपले निवेदन मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे. असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समिती, तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment