अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिला... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिला...

 अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिला...

आरोपीस 1 वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  शाळेतील विद्यार्थ्याीनी, महाविद्यालयीन युवतींना छेडणार्‍या रोडरोमिओंना सावधानतेचा इशारा देणारा निकाल न्यायालयाने सुनावला आहे. सुनिल रामदास सोनवणे, वय-22 वर्षे, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणेकर यांनी आरोपीस व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) प्रमाणे दोषी धरून 1 वर्ष सक्तमजुरी व 5000 रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच 1 वर्ष सक्तमजुरी व 5000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या दंडाची एकूण रक्कम 10,000/- रुपये पीडित मुलीस देण्याचा आदेश पारित केला आहे.
   सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, 14 मार्च 2018 रोजी पीडितेचे 10 वी चे पेपर चालू असल्याने व तिचा नंबर मुलिका देवी विद्या मंदिर निघोज ता. पारनेर येथे असल्याने फिर्यादी पीडित मुलगी ही सकाळी शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत झाडाखाली अभ्यास करत असताना आरोपी हा त्यांचे जवळ आला व पीडित मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्याभोवती मोटरसायकलवर तिच्याकडे पाहात चार फेर्‍या मारून निघून गेला. त्यानंतर पेपर संपल्यानंतर पीडित मुलीने झालेली घटना तिच्या वडिलांना सांगून ते फिर्याद देण्यासाठी पारनेर पोलीस स्टेशन येथे गेले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध पोस्को कायदा कलम गुन्हा नोंदविण्यात आला या गुन्ह्याचा तपास सहा.पो. निरीक्षक एस.ई. मातोंडकर यांनी करून मा. न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आणेकर साहेब यांचेसमोर झाली. वरील खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील डी.आर. दळवी यांनी काम पाहिले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 06 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये पीडित मुलगी, पीडित मुलीचे वडील, पंच व तपासणी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी- पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकील डी.आर. दळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर दंडाच्या रकमेपैकी 10,000/- रुपये पीडित मुलीस देण्याचा आदेश पारित केला, सदर खटल्याची सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी ए.एस.आय. लक्ष्मण काशीद यांनी अतिरिक्त सरकारी वकील डि.आर. दळवी यांना मदत केली.

No comments:

Post a Comment