महापालिका कामगारांच्या आंदोलनाला यश विविध मागण्यांबाबत तातडीने निर्णय! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

महापालिका कामगारांच्या आंदोलनाला यश विविध मागण्यांबाबत तातडीने निर्णय!

 महापालिका कामगारांच्या आंदोलनाला यश विविध मागण्यांबाबत तातडीने निर्णय!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  महापालिका कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काल महापालिका मुख्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन आयुक्तांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. आनंद लोखंडे,सरचिटणीस आनंदराव वायकर, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त पठारे, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, दत्तात्रय जाधव, आयुब शेख, बलराज गायकवाड, अकिल सय्यद, नंदू नेमाने, राहुल साबळे यांचे मध्ये चर्चा होऊन मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
   लिपिक/टंकलेखक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, मुकादम इ. पदावर दोन वर्षांपूर्वी पदोंन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांचे पदोन्नती विषयक परीक्षा विधीन कालावधी संपुष्टात आल्याने सदर कर्मचार्‍यांना तात्काळ पदोन्नती कायम केले बाबतचे अंतिम आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    शासनाने नुकतेच दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांची 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येऊन कामकाज चालविण्याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करण्याचे मागणीबाबत सविस्तर चर्चा होऊन शासकीय आदेशाची पडताळणी करून निर्णय घेण्याचे ठरले आहे.
    महानगरपालिकेतील सध्या कार्यरत कर्मचार्‍यांची संख्या अतिशय कमी असल्याचे परिणामी कामगारांवर कामाचा प्रचंड ताण असल्याने महानगरपालिकेच्या आकृतिबंधानुसार रिक्त असलेल्या विविध संवर्ग व खात्यातील 1186 रिक्त पदांवर पात्र कर्मचार्‍यांना बढती/पदोन्नती देणे, 12 व 24 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती चे लाभ देणे इ. कारणांसाठी मा. निवड समितीची तात्काळ आयोजन करून निर्णय घेण्यात यावा या मागणीबाबत सदर कामी तातडीने मा. निवड समितीचे आयोजन करण्याचे आदेश मा. आयुक्तांनी दिले आहेत.
        शासन निर्णयानुसार एल. जी. एस व एल. एल. जी. डी परीक्षा उत्तीर्ण कर्मचार्‍यांना दोन वेतनवाढी लागू करणेकामी कायदेशीर बाबी तपासून तातडीने कार्यवाही करण्याचे ठरले आहे.
     अंशदान पेन्शन योजनेतील कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी मधील महानगरपालिका हीस्साचे थकीत हप्ते माहे एप्रिल 2021 अखेर कर्मचार्‍यांचे खात्यात वर्ग करण्याचे ठरले आहे.
     महापालिकेचे कर्तव्य बजावीत असताना कोरोना आजाराने मरण पावलेल्या 4 कर्मचार्‍यांचे वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणे व शासनाचे सुरक्षाकवच विमा योजनेअंतर्गत रू. 50 लाख नुकसान भरपाई कामी मिळणे कामी मा. शासनाकडे महापालिकेचे वतीने आवश्यक कायदेशीर पाठपुरवठा करण्यात येत असल्याचे महापालिकेचे वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
      महापालिकेमार्फत सफाई कामगारांना बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडून त्यांचे बाबत वैठ बगारी प्रथेचे अवलंब करण्याचे अन्यायकारक धोरण तात्काळ मागे घेण्याची मागणीबाबत घनकचरा व्यवस्थापनाने सर्व अधिकारी व युनियन प्रतिनिधी यांचे समवेत स्वतंत्र संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे मा. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रकोप वाढत असल्याने महानगरपालिकेतील कार्यालयीन कर्मचार्‍यांसह सर्व कामगारांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज इ. संरक्षण साधने तात्काळ  देणेकामी महापालिकेचे स्टोअर्स विभागाने सर्व विभागाची मागणी प्रस्ताव मागवून घेऊन तत्पर कार्यवाही करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.      महानगरपालिकेतील सफाई कामगारांसह मात्र कर्मचार्‍यांना गणवेश देणे कामे तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मा. आयुक्तांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होऊन परीक्षा विधिन कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना अंतिम नियुक्ती आदेश देणे कामी तातडीने कार्यवाहीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.महापालिकेच्या सेवेत सन 2012 ते 2016 या कालावधीत एकत्रित वेतनावर कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्याचे धोरण महापालिकेने घेतलेले होते. तद्नंतर 2016 चे अखेरीस सदर कर्मचार्‍यांना एकत्रित वेतना ऐवजी वेतन श्रेणी लागू करण्यात येऊन वेतन श्रेणीचे लाभ देण्यात आले. त्यामुळे सदर सन 2012 ते 2016 या कालावधीत कर्मचार्‍यांना वेतन वाढी लागू करण्यात आल्या नाहीत व सदर बाबतचे लाभ अद्यापि देण्यात आलेले नाहीत. संबंधित कर्मचार्‍यांना सदर कालावधीतील वार्षिक वेतनवाढी लागू करण्यात याव्यात या मागणी बाबत सर्व कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल असे महापालिकेचे मा. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
        दिवाळी सणाचे वेळी महापालिका व युनियन यांचेत झालेल्या उभयपक्षी करारानुसार महापालिकेतील सर्व पात्र कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन उद्योगाचा तिसरा हप्ता तातडीने देणे कामे कार्यवाही करण्याचे आदेश महापालिकेचे मा. आयुक्तांनी दिले आहेत.
     महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन तातडीने लागू होणे कामी महापालिकेचे वतीने मा. शासनाकडे महापालिकेच्यावतीने सातत्याने पाठवला सुरू असल्याचे मा. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
     मा. शासनाने शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचे दोन टप्प्यात कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे धोरण घेतलेले आहे. त्यास अनुसरून महापालिकेतील फ्रंट लाईन वर्कर्स मधील सर्व सफाई कर्मचार्यांचे सक्तीने व तात्काळ लसीकरण करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment