आ.अरूणकाका जगतापांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानकडून रक्तदान शिबीराचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

आ.अरूणकाका जगतापांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानकडून रक्तदान शिबीराचे आयोजन.

 आ.अरूणकाका जगतापांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानकडून रक्तदान शिबीराचे आयोजन.

रक्ताचा तुटवडा. रक्तदान शिबिरांची गरज ः वाकळे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये गेल्या एक वर्षापासून रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.  इतर आजारांना रक्ताची मोठया प्रमाणात गरज भासत आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढे येवून रक्तदान शिबीराचे आयोजन करावे. असे प्रतिपादन महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केले. प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आयुर्वेद कॉलेज येथे आमदार अरूणकाका जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे उदघाटन महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांचे हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. श्री वाकळे पुढे म्हणाले की, सण, उत्सव,  वाढदिवस साजरा करित असताना प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करावे आमदार अरूणकाका जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त प्रेरणा प्रतिष्ठानने माध्यमातून सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबीराचे आयोजन करून ख-या अर्थाने रूग्णदात्याची सेवा करण्याचे काम केले आहे.
   यावेळी मा.आ.श्री.अरूणकाका जगताप म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. माझ्या वाढदिवसा निमित्त अनेक वर्षापासून रक्तदानाची परंपरा सुरू आहे. आजच्या युवकांना रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी रक्तदान ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये मोठया प्रमाणात रक्ताचा तुतवडा जाणवत आहे. यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे येवून रक्तदान करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले
यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी रक्तदान केले. शहरातील 250 विविध मान्यवरांनी व युवकांनी आपले रक्तदान केले. यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, संजय चोपडा, अमोल गाडे, समद खान, अजिंक्य बोरकर, भा कुरेशी, प्रकाश भागानगरे, अक्षय कर्डिल, स्वप्नील शिंदे, सचिन बारस्कर,  बाळासाहेब बारस्कर, अंबादास गारूडकर, अशोक बाबर, दिपक सुळ, सुमतीलाल कोठारी, अनिल मुरकुटे, सुरज शेळके, मकरंद देशपांडे, रत्नाकर कुलकर्णी, डॉ.सागर बोरूडे, सुनिल त्रिंबके, दत्तात्रय मुदगल, विजय गव्हाळे, नरेंद्र कुलकर्णी, उबेद शेख, संजय झिंजे, रेश्मा आठरे, विकी जगताप, सुनिल कोतकर, संजय सपकाळ, संभाजी पवार, अभिजीत खोसे, सुमित कुलकर्णी, संतोष लांडे, संतोष ढाकणे, वैभव वाघ, मोहन गुंजाळ, विजय सुंबे, विशाल पवार, मळू गाडळकर, वैभव ढाकणे, अतुल कांबळे, गणेश गोरे, अफजल शेख, अंकुश चत्तर, वाहिद हुंडेकरी, अक्षय डाके, सिताराम काकडे, नसीम हुंडेकरी, सनी शिंदे, सुरेश बनसोडे, गौरव कु-हाडे, अच्युत गलांडे, अंजली आव्हाड, मंगेश खताळ, लकी खुबचंदानी, राम वाघ, सनी आगरकर, भुषण गुंड, माऊली जाधव, तुका कोतकर, सग्राम सुर्यवंशी, सागर गुंजाळ, .ऋषी ताठे, राहुल जाधव, दत्ता तापकिरे, किरण दाभाडे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here