छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले ः सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले ः सातपुते

 छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले ः सातपुते

दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे शिवसेनेच्यावतीने स्वागत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात. सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठ आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. प्रशासन, लष्कर, आरमार, दुर्ग, व्यापार, उद्योग या क्षेत्रातच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले, असे नाही तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रातही नवे पायंडे पाडले, नवे दंडक निर्माण केले आहेत. अशा थोर जाणता राजाची प्रेरणा सर्वांना मिळावी, यासाठी युवकांनी काढलेल्या शिवज्योतीचे स्वागत करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो, असे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केेले.
     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे एस.टी.स्टॅण्ड येथील महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, ग्रा.पं.सदस्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर,  माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, अरुणा गोयल, योगिराज गाडे, गोरख बेरड, महेंद्र बेरड, प्रशांत बेरड, आदित्य बेरड, ज्ञानेश्वर कराळे, भाऊ बेरड, बाबा करोडे, आदिनाथ साळूंके आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी आशा निंबाळकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे लहानांपासून थोरांचा आदर्श आहेत. शिवचरित्रांचे स्मरण सर्वांना व्हावे, त्यांनी चेतवलेली चेतना जागृत रहावी, यासाठी युवकांनी काढलेली ही शिवज्योत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभारची साक्ष देत आहे. युवकांनीमध्ये महाराजांविषयी असलेला आदरभाव हा कायम राहिल, असे सांगून युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, अरुणा गोयल आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श जीवनपद्धतीचे अनेक उदाहरणे सांगितले.

No comments:

Post a Comment