टाकळी ढोकेश्वरप्रमाणे इतरही ठिकाणीही विकासकामे केली जातील ः दाते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

टाकळी ढोकेश्वरप्रमाणे इतरही ठिकाणीही विकासकामे केली जातील ः दाते

 टाकळी ढोकेश्वरप्रमाणे इतरही ठिकाणीही विकासकामे केली जातील ः दाते


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील पिंपळगाव रोठा व पाबळ येथील  24 लक्ष रुपयांचे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले

यामध्ये पिंपळगाव रोठा ता. पारनेर येथील जिल्हा परिषद सेस अंतर्गत 1. पिंपळगाव रोठा ,अक्कलवाडी ते मुळे वस्ती रस्ता सुधारणे- रु 3 लक्ष, 2.  पिंपळगाव रोठा अक्कलवाडी रस्ता ते मुंढे वस्ती रस्ता सुधारणे- रु. 4 लक्ष, 3. खंडोबाची वाडी ते  ढोमे वस्ती सुधारणे- रु.3 लक्ष, 4. पिंपळगाव रोठा ते नागझरी सुधारणे- रु. 4  लक्ष अशा रु. 14 लक्ष व पाबळ येथील खंडोबा मंदिर सभामंडप बांधकाम करणे रुपये दहा लक्ष अशा 24 लाख रुपयांचे कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सभापती म्हणाले पिंपळगाव रोठा येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरू असे काम करून दाखवू आळकुटी येथील सभामंडपाचे उद्घाटन करताना सभापती म्हणाले की या परिसरातील लोकांनी माझ्यावर पहिल्यापासून प्रेम केले आहे. माझे या लोकांशी ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षापासून चा आहेत येथील सगळ्यात गावचे कार्यकर्ते मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात यामुळे या परिसरात विकास कामे करताना मला काही अडचण येत नाही माझ्या टाकळीढोकेश्वर गटामध्ये जसे विकासाचे काम केले तसे या परिसरातही अनेक विकास कामे मार्गी लावण्याचे काम निश्चितच केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
आपल्यावर कोरोना चे भयानक संकट आले आहे सर्वांनी आपापल्या कुटुंबाची व आपली काळजी घ्यावी कोरोनाच्या बचावासाठी जे जे उपाय करता येतील त्याचा वापर करावा व सुरक्षित राहावा असे अहवान केले.
यावेळी पंचायत समिती सभापती गणेश राव शेळके, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे ,खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष ड पांडुरंग गायकवाड, आळकुटी चे सरपंच डॉक्टर कोमल भंडारी , रेनवडी चे सरपंच भिवसेन येवले,  उपतालुकाप्रमुख संतोष येवले, पाबल चे सरपंच संदेश कापसे, रखमाजी कापसे सर, माजी सरपंच राजेंद्र कवडे ,गारखिंडी चे सरपंच निवृत्ती चौधरी ,वडनेर बुद्रुक चे सरपंच पांडुरंग येवले, पिंपळगाव चे सरपंच सुरेखा वाळुंज, उपसरपंच महादेव पुंडे ,ग्रा.पं.सदस्य तानाजी मुळे ,सुषमा घुले, युवा नेते गोपीनाथ घुले, भगवान सांबरे, जालिंदर खोसे , पं. स. जूनियर इंजीनियर जाधव साहेब कामाचे ठेकेदार सुनील कुदळे व बापू तांबे उपस्थित होते इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रखमाजी कापसे सर यांनी केले तर आभार माजी सरपंच राजेंद्र कवडे यांनी मानले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here