शहरातील ‘या’ खाजगी रुग्णालयात कोवीड लस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

शहरातील ‘या’ खाजगी रुग्णालयात कोवीड लस.

 शहरातील ‘या’ खाजगी रुग्णालयात कोवीड लस.

अहमदनगर  - आजपासून खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सुरुवात होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने खाजगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसची किंमत 250 रुपये निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत असणार आहे. जिल्ह्यातील 35 खाजगी रुग्णालयात ही लस 250 रुपयांना मिळणार आहे. याच केंद्रावर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. तसेच ‘को-विन’ आणि ‘आरोग्यसेतु’ या अँपवर सुध्दा नोंदणी करता येणार आहे. बूथ हॉस्पिटल, साईदीप हॉस्पिटल, गरुड हॉस्पिटल, स्वास्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाईक बालरोग रुग्णालय, सुंदर नेत्रालय, आनंदऋषीजी हॉस्पिटल, डॉ.अनभुले रुग्णालय, एशियन नोबल हॉस्पिटल, विखे पाटील रुग्णालय, बडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बुले हॉस्पिटल, इंदिरा हॉस्पिटल, सिध्दकला हॉस्पिटल, होले हॉस्पिटल, अल्फा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ओस्टेन हॉस्पिटल या ठिकाणी लस उपलब्ध असणार आहे.

No comments:

Post a Comment