जांब कौडगावला रंगले कुस्तीचे मैदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

जांब कौडगावला रंगले कुस्तीचे मैदान

 जांब कौडगावला रंगले कुस्तीचे मैदान

रंगतदार कुस्त्यांचा थरार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जांब कौडगाव (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. कोरोनाच्या बर्यात काळावधी नंतर रंगतदार कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला. उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा खर्से, सरपंच धनंजय खर्से, उद्योजक रवी बारस्कर, मनिष ठूबे, राजू शिंदे, पै.दादा पांडूळे, अतुल कावळे, सोमनाथ राऊत, निलेश मदने, राहुल गाडवे, अजय अजबे, बंडू शेळके, काका शेळके, सागर बारस्कर, संदीप कावरे आदी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले म्हणाले की, कोरोना महामारीची वर्षपूर्ती होत असताना नागरिकांना तब्बल एक वर्ष या संकटाशी झुंज द्यावी लागली आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती निर्माण झाली. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अनेकांनी व्यायामाचा मार्ग निवडला असून, निरोगी आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. टाळेबंदीत प्रशिक्षण व तालिम बंद असल्याने मल्लांच्या सरावामध्ये मोठा खंड पडला असून, मल्लांनी पुन्हा जोमाने सरावाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मल्लांच्या सुमारे 1 लाखा पर्यंत बक्षिसांच्या कुस्त्या लागल्या होत्या. चितपट कुस्त्यांनी कुस्ती रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विजयी मल्लांसह उपविजयी मल्लांना देखील रोख स्वरुपातील बक्षिस देण्यात आले.

No comments:

Post a Comment