कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड.

 कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड.

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा...

अहमदनगर : धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. धार्मिक ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, धुम्रपान न करणे, परिसरात न थुंकणे या नियमांचे उल्लंघन करणारास 100 रुपये इतका दंड होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. सदरचे अधिकार पोलीस नाईक ते पोलीस अंमलदार यांना देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here