राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार- जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार- जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहे

 राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार- जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पतसंस्थांची थकबाकी वसुलीची समस्या सुटसुटीत होवून 101 चे दाखले त्वरित मिळणे गरजेचे आहे. मात्र अनेक कारणांनी दाखले मिळण्यास विलंब होत असतो. ही समस्या सोडवण्यासाठी  अत्याधुनिक, डिजिटल, पेपरलेस, फेसलेस व ऑनलाइन पद्धतीने होण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘101 कारवाई ’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर कामाचा वेग वाढवणारे आहे. सर्व तालुका उपनिबंधकांनी व पतसंस्थांनी हे  नवे सॉफ्टवेअरचा उपयोग सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व तालुका उपनिबंधकांनी त्याच बरोबर जास्तीतजास्त पतसंस्थांनी हे सॉफ्टवेअर घ्यवे. सर्व तालुका उपनिबंधकांना काय अपेक्षित आहे, यात अजून काय सुधारणा कराव्यात या बाबत सूचना कराव्यात. ‘101 कारवाई ’ या सॉफ्टवेअर मुळे राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार आहे, अशी माहिती जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित बैठकीत सहकरी पतसंस्थांची 101 चे दाखले वेगाने सादर होण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनीने तयार केलेले ‘101 कारवाई ’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यासाठी सर्व तालुका उपनिबाधकांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन नगरमध्ये करण्यात आले होते. या बैठकीत ‘101 कारवाई ’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची डिजिटल स्क्रीनवर सविस्तर माहिती देण्यात आली. उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सुरेखा लवांडे, सॉफ्टवेअरचे निर्माते विनीत डावरे आदींसह सर्व तालुक्यांचे उपनिबंधक उपस्थित होते.
यावेळी काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांची कर्ज थकबाकी वेगाने व्हावी यासाठी 101 चे दाखले त्वरित मिळावेत ही मागणी राज्य पतसंस्था फेडरेशन कित्तेक वर्षांपासून सहकार विभागाकडे करत आहे. आता डिजिटल व ऑनलइन तंत्रज्ञानाचा काळ आला आहे. म्हणूनच राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘101 कारवाई ’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर मुळे 101 ची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने गतिमान होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून 101 च्या दाखल्यांचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कमी वेळात बिनचूक पद्धतीने सहकार खात्याकडे ऑनलाईन पद्धतीने वेगाने सादर होणार आहे. या डिजिटल सॉफ्टवेअरचे आत्तापर्यंत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह सहकर विभागाचे सचिव व आयुक्त यांच्यापुढे सादरीकरण झाले आहे. सर्वांनी या सॉफ्टवेअरला ग्रीन सिग्नल दिला आहे. तालुका उपनिबंधक स्वतः हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष वापरणार असल्याने यात काय काय सुधारणा होणे आवश्यक आहे याबाबतच्या महत्वपूर्ण सूचना सर्वांनी कराव्यात. त्याच बरोबर जिल्ह्यातील जास्तीतजास्त पतसंस्थांनीही या सॉफ्टवेअरचा वापर सरू करावा. नगर जिल्ह्यात या सॉफ्टवेअरचा उपयोग पायलट प्रोजेक्ट म्हणून वापर सुरु होणार असून 1 मे महाराष्ट्र दिनापासून पूर्ण राज्यात या सॉफ्टवेअरचा उपयोग सुरु होणार आहे. यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी आपापल्या तालुक्यातील पतसंस्थांना 101 च्या दाखल्याच्या या अत्याधुनिक व सुटसुटीत सॉफ्टवेअर बद्दल जास्तीतजास्त माहिती देवून वापर सुरु करावा, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment