दरोड्यातील फरार आरोपीला बेलवंडी पोलिसांनी केली अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

दरोड्यातील फरार आरोपीला बेलवंडी पोलिसांनी केली अटक

 दरोड्यातील फरार आरोपीला बेलवंडी पोलिसांनी केली अटक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा परिसरात 17 सप्टेंबर 2019 रोजी दरोडा टाकून फरार झालेल्या लायसन टसाळू भोसले रा. पांढरेवाडी, कोळगाव याला बेलवंडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार छापा टाकून अटक केली.
   या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा परिसरात 17 सप्टेंबर 2019 रोजी पडलेल्या दरोड्यातील आरोपी लायसन टसाळू भोसले हा दरोडा टाकून फरार झाला होता. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना फरार आरोपी लायसन टसाळू भोसले हा पांढरेवाडी येथे आल्याची गुप्त माहिती मिळाली. असता त्यांनी पोलिस नाईक डी. आर. पठारे व संतोष गोमसाळे यांना आदेश देत मिळालेल्या माहितीची खात्री करून आरोपीला ताब्यात घेण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पांढरेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता घटनेतील फरार आरोपी लायसन टसाळू भोसले हा तेथे मिळून येताच त्याला बेलवंडी पोलिसांनी अटक केली.सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक डी. आर. पठारे, संतोष गोमसाळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल हसन शेख,  यानी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here