नगर पंचायत समितीवर सहाव्यांदा भगवा..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

नगर पंचायत समितीवर सहाव्यांदा भगवा..!

 नगर पंचायत समितीवर सहाव्यांदा भगवा..!

सभापतीपदी सुरेखा गुंड,  उपसभापतीपदी दिलीप पवार.


अहमदनगर :
नगर तालुका पंचायत समितीवर गेल्या 15 वर्षांपासुन शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले असूनआता सहाव्यांदा पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. आज सभापती, उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणूकीत सभापतीपदी सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी डॉ. दिलीप पवार यांची वर्णी लागली आहे.

सव्वा वर्षांपूर्वी सभापती व उपसभापती निवडताना सव्वा वर्षाचा फॉर्मुला वापरला होता. यानुसार सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रविंद्र भापकर यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला शद्ब पाळत  आपल्या पदाचे राजीनामे दिले. पक्षश्रेष्ठी व प्रशासनाने त्यांचे राजेनामे मंजूर केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूकीचा कार्यक्रम शुक्रवार दि .26 रोजी पंचायत समिती कार्यालय येथे जाहीर केला. यानुसार शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.  सध्या पंचायत समितीत शिवसेनेचे 7 , कॉग्रेसचे 1 , व भाजपचे 4 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. सेना -कॉग्रेस यांची आघाडी असल्याने त्यांच्या जागा 8 होतात. यावेळी पंचायत समितीत महाआघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने व कॉग्रेसच्या एकमेव सदस्याला उपसभापती पदाची संधी मिळाल्याने आता दोन्ही जागांवर शिवसेनेची वर्णी लागली आहे. नगर तालुका पंचायत समिती च्या सभागृहा मध्ये हि निवड करण्यात आली निवडणूक  निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांच्या उपस्थित हि  निवड प्रक्रिया पार पडली . सभापती, उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने हि निवड बिनविरोध करण्यात आली . यावेळी कांताबाई कोकाटे , रामदास भोर , रविंद्र भापकर , गुलाब शिंदे , व्ही. डी. काळे , मंगल आव्हाड उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment