नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उद्या जिल्हा दौऱ्यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उद्या जिल्हा दौऱ्यावर

 नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उद्या जिल्हा दौऱ्यावर नगरी दवंडी

अहमदनगर - अहमदनगर दि.26:- महाराष्ट्र राज्याचे  नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.


            शनिवार दिनांक 27 मार्च 2021 रोजी सकाळी 9 वाजता निवासस्थान राहुरी येथून शासकीय वाहनाने वांबोरी ता. राहुरीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता वांबोरी येथे आगमन व कोरोना संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.15 वाजता वांबोरी येथून शासकीय वाहनाने अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन व कोरोना संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन भवन अहमदनगर येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता अहमदनगर येथून शासकीय वाहनाने राहुरकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता राहुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता राहुरी येथून शासकीय वाहनाने श्रीरामपूरकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता श्रीरामपूर येथे आगमन व महावितरण व कोरोना संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- तहसिल कार्यालय, श्रीरामपूर. दुपारी 3.15 वाजता आ. लहुजी कानडे यांचेकडे सांत्वनपर भेट. दुपारी 3.30 वाजता श्रीरामपूर येथून शासकीय वाहनाने कोपरगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता कोपरगाव येथे आगमन व कोरोना संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.50 वाजता कोपरगाव येथून शासकीय वाहनाने सांगवी भुसारकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता सांगवी भुसार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता सांगवी भुसार येथून शासकीय वाहनाने राहुरीकडे प्रयाण. रात्री 8 वाजता निवासस्थान राहुरी येथे आगमन व राखीव.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here