जेऊर येथील महाराष्ट्र बँक बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

जेऊर येथील महाराष्ट्र बँक बंद

 जेऊर येथील महाराष्ट्र बँक बंद 

कर्मचारी कोरोना बाधित

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जेऊर येथील महाराष्ट्र बँक शाखेचा कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक बंद ठेवण्यात आली आहे. मार्चअखेर असल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा झालेला आहे.
जेऊर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेतील कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक व्यवस्थापनाने बँकेचे संपूर्ण कामकाज बंद ठेवले आहे. नागरिकांना कर्जप्रकरणे नवी-जुनी करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे.
अनेक शेतकर्‍यांची खाते राष्ट्रीयकृत बँक म्हणून महाराष्ट्र बँकेतच आहेत. खेळते भांडवलाचे कर्जप्रकरणेही  नवे-जुने करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी बँकेत  जावेच लागते. मार्च अखेरीस सर्व कर्ज प्रकरणे भरण्यासाठी तसेच व्याज भरण्यासाठी पैशाची देवाणघेवाण करावी लागते. बँक बंद असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. बँक बंद असल्याबाबतचा फलक बँकेच्या दरवाजावरच लावण्यात आला आहे. 
बँक बंद असल्याने शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बँकेने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here