महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी विकास सासवडे यांची - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी विकास सासवडे यांची

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी विकास सासवडे यांची

साकतखुर्द येथील ग्रामस्थांच्यावतीने सत्कारनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बालेवाडी, पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुटेफळ (ता. आष्टी ) येथील विकास सासवडे यांची 86 किलो वजन गटातून निवड झाल्या बद्दल त्यांचा साकतखुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच बाबासाहेब चितळकर यांनी शाल व श्रीफळ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
यावेळी योगेश बोरकर, युवा नेते रामदास चितळकर, सुकाणू समितीचे पांडुरंग शिंदे, बद्रीनाथ निमसे, शिवाजी बोचरे, किरण निमसे, राजेंद्र वाघमोडे, अजय चितळकर, देविदास जरे आदी ग्रामस्थांनी सासवडे यांचे अभिनंदन केले.
64 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020-21अहमदनगर जिल्हा निवड चाचणी निकाल नुकताच लागला यात 86 किलो वजन गटात विकास सासवडे यांची निवड झाली.
ग्रामीण भागात सोयी सुविधांची वाणवा असताना केवळ कष्ट व जिद्दीच्या जोरावर विकास सासवडे यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाप्रसंगी साकतखुर्द येथील ग्रामस्थांनी  महाराष्ट्र केसरी किताब मिळावा म्हणून सासवडे यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment