डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद वाढवावा ः आमदार संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद वाढवावा ः आमदार संग्राम जगताप

 डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद वाढवावा ः आमदार संग्राम जगताप

मार्केट यार्ड येथे शिवनेरी मल्टीस्पेशालिट हॉस्पीटलचे उद्घाटन संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवसेंदिवस वैद्यकिय क्षेत्रात काम करने सोपे काम नाही कारण आता वेगवेगळे आजार निर्माण होत आहे. कोरोना संसर्ग विषाणूची आपल्याला कुठलीही माहिती नव्हती, अभ्यास नव्हता, व औषधही नव्हते तरीसुद्धा वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांनी या विषाणूवर काम करून रुग्णाना जीवदान दिले. डॉक्टरांनी रुग्णाशी संवाद वाढवून समाधान करावे व धीर द्यावा डॉक्टर सुदर्शन जाधव व डॉ. महेश देशपांडे यांनी श्रीगोंदा व कर्जत येथे वैद्यकिय सेवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांशी एक अतुट नाते निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षाचा अनुभव असल्यामुळे नगर शहरात सुरू करण्यात आलेले शिवनेरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून गोरगरिब रूग्णांची सेवा केली जाणार आहे. हॉस्पीटलच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोनातून डॉक्टरांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासावी. तसेच कष्टकरी, शेतकरी बांधवांना अल्पदरात आरोग्य सेवा देण्याचे काम करावे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मार्केटयार्ड येथे शिवनेरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी म.न.पा. विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगर सेवक डॉ. सागर बोरूडे, डॉ. अभिजीत पाठक, डॉ. सतिश सुपेकर, डॉ. सागर वाघ, संचालक सुदर्शन वाघ, डॉ. महेश देशपांडे, डॉ. सौ. मृणालिनी जाधव, वैशाली देशपांडे, डॉ. महेश बार्‍हाटे, आदी उपस्थित होते. डॉ. सागर बोरूडे म्हणाले की, ग्रामीण भागात चांगल्या दर्जेची वैद्यकिय सेवा देण्याचे काम केले. आता नगर शहरात शिवनेरी हॉस्पीटलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाना सेवा देण्याचे काम केले जाणार आहे. हॉस्पीटलच्या शिवनेरी नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार अंगीकारून रुग्णाना सेवा दिली जाणार आहे. असे ते म्हणाले. डॉ. महेश देशपांडे म्हणाले की, ग्रामीण भागातून शहरात येऊन शिवनेरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू केले आहे. येथे सुसज़ ऑपरेशन थेटर, आय.सी.यु. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा दिली जाणार आहे. सर्व वैद्यकिय सेवा अल्प दरात दिल्या जातील. तसेच सामाजिक बांधिलीकीतून वर्षभर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत रुग्णसेवा केली जाईल. असे ते म्हणाले. डॉ. सुदर्शन जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment