काँग्रेसने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला- विनायकराव देशमुख. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

काँग्रेसने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला- विनायकराव देशमुख.

 काँग्रेसने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला- विनायकराव देशमुख.

स्व.अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांना प्रदेश काँग्रेस श्रध्दांजली...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कॉग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते गावोगावी अत्यंत निष्ठेने काम करीत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता काम करणारे हे कार्यकर्ते म्हणजे पक्षाची संपत्ती आहे. अशा कार्यकर्त्यांना किमान मान-सन्मान मिळवून देणे, ही पक्षाची  जबाबदारी आहे. भिंगार ब्लॉक कॉन्ग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांच्या अनपेक्षित निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेस कमिटीचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी स्व. अ‍ॅड. आर.आर.पिल्ले यांना श्रध्दांजली अर्पण केली.देशमुख यांनी स्व.आर.आर.पिल्ले यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी  एच.के.पाटील, अ.भा. काँग्रेसचे सचिव वामसी रेड्डी यांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण केली.
अहमदनगर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याला दरवर्षी निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार  देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी यावेळी केली. प्रतिवर्षी मार्च महिन्यात जिल्हास्तरावर निष्ठावंत कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार वितरीत करण्यात येईल. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप असेल. स्व.आर.आर.पिल्ले यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस उबेद शेख म्हणाले,  माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या ना. बाळासाहेब थोरात यांनी काल अहमदनगर शहरात असताना स्व.पिल्ले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परीवाराचे सांत्वन करणे ही त्यांची जबाबदारी होती. स्व.पिल्ले हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तर होतेच  पण त्यांचे वडील क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते. ना.थोरात यांच्या या गटबाजीने प्रेरीत वागणुकीचे काँग्रेस पक्षात जिल्हाभर तीव्र पडसाद उमटत असुन  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. स्व.इंदिरा गांधी यांच्या काळात सामान्य कार्यकर्त्याला शक्ती व सन्मान देण्याचे काम केले जात असे. त्यामुळे काँग्रेस तळागाळापर्यंत भक्कम होती. आता मात्र  मी, माझे नातेवाईक, माझा गट या विचारामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे.  अशी भावना राजेश सटाणकर यांनी व्यक्त केल्या. शेवटी प्रदेश सदस्य श्री. शाम वागस्कर यांनी आभार मानले. याप्रसंगी देशमुख यांच्या समवेत प्रदेश सदस्य शाम वागस्कर, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, मा.शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक रुपसिंग दादा कदम, स्व.पिल्ले यांचे बंधू गोपाल पिल्ले, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, माध्यम प्रमुख राजेश सटाणकर, भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मार्गारेट जाधव, भिंगार सरचिटणीस अनिल परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
स्व.पिल्ले यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी व शहर जिल्हा काँग्रेसने त्यांच्या निधनानंतर दाखविलेली संवेदनहीनता अत्यंत दु:खदायक व दुर्दैवी आहे. राज्याचे महसुलमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर शहराच्या दौ-यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. आपल्याच एका सहका-याचे, भिंगार ब्लाँक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांचे नुकतेच निधन झालेले असताना त्यांना बैठकीत किमान श्रध्दांजली देखील अर्पण करण्यात आली नाही. याउलट भाजपच्या माजी खासदाराच्या घरी जाऊन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांनी स्व.पिल्ले यांच्या घरी जाणे गरजेचे होते. ना.थोरात हे चुकीच्या सल्लागारांमुळे अहमदनगर शहरातील काँग्रेस संघटनेचे प्रचंड नुकसान करीत आहेत. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. -बाळासाहेब भुजबळ माजी अध्यक्ष शहा कॉग्रेस

No comments:

Post a Comment