महालक्ष्मी उद्यानातील स्क्रॅप पासून या शिल्पाची निर्मिती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

महालक्ष्मी उद्यानातील स्क्रॅप पासून या शिल्पाची निर्मिती

 महालक्ष्मी उद्यानातील स्क्रॅप पासून या शिल्पाची निर्मिती.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः या शिल्पाची निर्मिती महालक्ष्मी उद्यानातील स्क्रॅप पासूनच झाली असून याची उंची 15 फूटापेक्षा अधिक तर याकरीता तब्बत 1 टनापर्यंत भंगार साहित्य वापरले गेले.
या शिल्पाची निर्मिती ऋषीकेश संजय चांदगुडे यांनी केली असून ते सध्या सर ज.जी. कला महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 103 व्या आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी त्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. हे शिल्प साकारण्यात त्यांचे सहकारी  अतुल आळकुटे, राहुल कांबळे, युसुफ मोहम्मद यांनी मदत केली. या शिल्पातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यात पूर्णपणे उद्यानातील जुने पडून असलेले स्क्रॅप, जुन्या खेळण्या यात घसरगुंड्या, सी-सॉ, जुने लाईट्सचे पोल तसेच इतर काही टाकाऊ खेळण्यांचा वापर करण्यात आला आहे.
हे शिल्प महालक्ष्मी उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर घालेल व आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास पालिकेचे उद्यानप्रमुख श्री. मेहेर लहारे यांनी व्यक्त केला आहे.
या शिल्पाचे उद्घाटन माननीय श्री. आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय महापौर श्री. बाबासाहेब वाकळे, व स्थायी समितीचे सभापती श्री. अविनाश घुले, संजय ढोणे, विलास ताठे, निखिल वारे, रवी बारस्कर, सचिन जाधव हे यावेळेस उपस्थित होते.
तसेच  नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या उद्यान कार्यालयाचे उद्घाटनही यावेळी महापौरांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment