अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्यांचा सत्कार

 अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे 64 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतसाठी निवड झालेल्या शिव छत्रपती कुस्ती संकुल मधील कुस्ती मल्लांचा व त्यांना मार्गदर्शन करणार्या वस्तादांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्याची निवड चाचणी नुकतीच संगमनेर येथे पार पडली. या निवड चाचणीत शिव छत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथील अनेक मल्लांनी विविध वजन गटात या संकुलाचे संस्थापक पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश संपादन केले. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुस्ती मल्लविद्या महासंघाचे शहर अध्यक्ष पै. बंडू शेळके यांनी केले. कुस्ती मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे यांनी जिल्ह्याला कुस्ती मल्ल विद्येचा मोठा वारसा असून, अनेक दिग्गज पैलवान या मातीतून घडले आहेत. युवा मल्लांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन हा वारसा पुढे चालवण्याचे त्यांनी आवाहन केले. तर पै. युवराज पठारे यांनी कुस्ती मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे विशेष कौतुक करुन मल्लांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पै. युवराज पठारे यांनी कुस्ती संकुलाचे भविष्यातील ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे स्पष्ट केले. यावेळी नगर तालुका तालिम संघाचे सचिव पै. बाळासाहेब भापकर, पै. काका शेळके, अशोक (मामा) घोडके आदींसह प्रशिक्षक व मल्ल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment