कर्जत तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

कर्जत तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

 कर्जत तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संजय गांधी निराधार योजनेमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप करुन, सदर प्रकरण दडपणार्या कर्जत तहसीलदारवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, उपाध्यक्ष आकाश वाबळे, नामदेव धरम आदी सहभागी झाले होते. या उपोषणाची योग्य दखल घेतली गेली नसल्याने संघटनेने महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय गांधी योजनेमध्ये अपहार झाला असून, लेखापरीक्षण ऑडिटमध्ये सदर प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र या रकमेचा अपहार दडपण्याच्या दृष्टीकोनाने कर्जतचे तहसिलदार नानासाहेब अडागळे यांनी प्रयत्न केला आहे. पारनेर तालुका सैनिक बँकेशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे कर्जत तहसिलदार त्यांना पाठिशी घालून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. कर्तव्यात कसूर करणारे व शासनाची दिशाभूल करणार्या कर्जत तहसिलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्यासाठी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचा दीड वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. यासाठी संघटनेने दहा वेळा उपोषण करुन पाठपुरावा केला. मात्र त्यांना वेठीस धरुन त्यांची दखल घेण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे. यासाठी संघटनेने पुढील उपोषण महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेरला करण्याचे जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment