छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीनिमित्त सावली प्रतिष्ठानला अन्नधान्याचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीनिमित्त सावली प्रतिष्ठानला अन्नधान्याचे वाटप

 छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीनिमित्त सावली प्रतिष्ठानला अन्नधान्याचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. कोरोना विषाणूच्या काळामध्ये उत्साहात शिवजंयती साजरी न करता केडगाव येथील सावली प्रतिष्ठानला धान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती माजी नगर सेवक दिपक खैरे यांनी सांगितले.
कायनेटीक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्ष पै. युवराज दिपक खेरे प्रतिष्ठाच्या वतीने सावली प्रतिष्ठांना धान्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी  शहर प्रमुख दिलीप सातपुतेशहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगर सेवक योगिराज गाडे, नगर सेवक सचिन शिंदे, नगर सेवक प्रंशात गायकवाड, नगर सेवक विजय पठारे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, युवराज खैरे, कृष्णा खैरे, महादेव मिसाळ, नितीन लोखडे, अजय म्हस्के, ओम जगताप, सचिन मनकर, सुभाष भोलप, यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment