छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला - सुरेखा कदम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला - सुरेखा कदम.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला - सुरेखा कदम.

शिवरायांना अभिवादन.

सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकींना राज्य शासनाचा प्रतिबंध असल्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहावर विरजण...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. परंपरेनुसार फाल्गुन वद्य तृतीया आजच्या दिवशी भव्य प्रमाणात शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. माळीवाडा शाखा शिवसेना, नंदनवन मित्र मंडळ, बालाजी विठ्ठल रुक्माई देवस्थान व शाम नळकांडे मित्र मंडळ,  दिल्लीगेट तरुण मित्र मंडळ, पै. युवराज दीपक खैरे प्रतिष्ठान, बागरोजा हडको मित्र मंडळ यांच्या वतीने शिवरायांना अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
  शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्त्रीयांचा नेहमीच आदर केला. शत्रूच्या स्त्रीयांना मान-सन्मान करुन पाठविणारे शिवाजी महाराज त्याकाळातील आदर्श राज्यकर्ते होते. हा त्यांचा मोठेपणा त्यावेळेच्या सत्ताधिशांनीही मान्य केला. मराठी साम्राज्याचे संस्थापन उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.
    माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अश्वारुढ पुतळा उभारुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले,  महाराष्ट्रांचा स्वाभिमान आणि भारतीय गणराज्याचे महानायक म्हणून ओळखल्या जाणार्या शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून अनेक वर्षे मुघलांशी लढा देऊन त्यांना धूळ चारली होती. शिवाजी महाराजांचे चरित्र आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवसेनेच्यावतीनेही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन महाराजांना अभिप्रेत असलेले कार्य करत आहे, असे सांगितले.याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, संतोष गेनाप्पा, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल रमेश परतानी, शरद कोके, अशोक कानडे, विराज कदम, दिपाली आढाव, सोनू सैंदाणे, अप्पू बेद्रे आदि उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here