शिवरायांविषयी आदर व प्रेम आजही कायम ः दत्ता जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

शिवरायांविषयी आदर व प्रेम आजही कायम ः दत्ता जाधव

 शिवरायांविषयी आदर व प्रेम आजही कायम ः दत्ता जाधव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
   अहमदनगर ः महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमध्ये अनुकुल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. शिवाजी महाराजांनी अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवाजी महाराजांना जनतेचे मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे. त्यांचा आदर्श आज अनेक शतकापासून सर्वाना मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन नंदनवन मित्र मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव यांनी केले.टिळकरोड येथील नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  पुढे बोलतांना दत्ता जाधव म्हणाले, शिवसेनेच्यावतीने शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. परंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंधने असल्यास ती मर्यादित स्वरुपात साजरी होत आहे. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणारे स्व.अनिल राठोड यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, योगीराज गाडे, दिपक खैरे, संतोष गेनाप्पा, आदेश जाधव, अशोक तुपे, विशाल जाधव, ऋषी जाधव, रवी जाधव विशाल गायकवाड, विकास सपाटे, कुणाल गवळी, गणेश औशिकर, विशाल लोळगे, सचिन गोरे, प्रविण सपाटे, गणेश जाधव, विकी हिरणवाळे आदि उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासास उजाळा दिला.  

No comments:

Post a Comment