किशोर मरकड यांची डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

किशोर मरकड यांची डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

 किशोर मरकड यांची डिजिटल मीडिया संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील जेष्ठ पत्रकार व अहमदनगर प्रेस क्लबचे माजी सचिव किशोर मरकड यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली असून तसे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिले आहे
वृत्तपत्र बरोबरच आता डीजिटल मीडियाचे महत्त्व वाढत आहे पूर्वीपासून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून बातम्यांची वेगवेगळे चॅनल आहेत पण आता प्रत्येक जिल्ह्यात बातमीसाठी जिल्हास्तरीय चॅनल सुरू झाले असून त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे त्यातून जिल्ह्यातील व शहरातील बातम्यांना प्राधान्य मिळत आहे. मात्र वृत्तपत्रात काम करणार्‍या पत्रकारांना जसे संरक्षण आहे तसे डिजिटल मीडियाला प्राप्त करून देण्यासाठी ही संघटना स्थापन केली आहे या माध्यमातून डिजिटल मीडिया मध्ये काम करणार्‍या पत्रकारांना व स्तंभ लेखकांना व्यासपीठ मिळवून देणे व त्यांचे प्रश्न सोडवणे या कामी ही संघटना पुढाकार घेणार आहे
किशोर मरकड हे अहमदनगर प्रेस क्लबचे माजी सचिव असून महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष अहमदनगर टुरिझम फोरमचे अध्यक्ष  आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष आशा संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तसेच विविध वृत्तपत्रातून आणि स्थानिक वृत्तवाहिन्यातून विशेष बातमीदार स्तंभलेखक   म्हणून काम करीत नगर येथे  सुरू करण्यात आलेली पहिली महानगर न्यूज   चॅनल सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. तसेच  सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखन करीत आहेत. संघटनेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी नगर सह्याद्री  न्यूज चॅनलचे चे संपादक अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली असून या संघटनेत सहभागी होणार्‍या डिजिटल मीडियात काम करणार्‍या पत्रकारांनी शिवाजी शिर्के 94 22 22 17 61 व किशोर मरकड 7350553131 याच्याशीं संपर्क साधावा असे  असे आवाहन राजा माने यांनी केले आहे.  लवकरच नगर जिल्हा व नगर शहर कार्यकारिणीची निवड करण्यात येईल असे ते म्हणाले. त्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार अरुण काका जगताप ,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप, आमदार सुधीर तांबे ,महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment