केंद्रीय वने, पर्यावरण समितीवर पोपटराव पवार यांची नियुक्ती
पद्मश्री पोपटराव पवार यांच्यावर केंद्राने सोपवली मोठी जबाबदारी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीच्या सदस्यपदी राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. पोपटराव पवार यांच्या निवडीमुळे केंद्र सरकारच्या या समितीवर अलिकडच्या काळात राज्याला खूप कालावधीनंतर सदस्यत्व मिळाल्याचे सांगण्यात येते.
केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. मागील महिन्यात या समितीच्या सदस्यपदी काम करण्याबाबत पोपटराव पवार यांना विनंती करण्यात आली होती. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे या समितीचे अध्यक्ष असून त्यात लोकसभा, राज्यसभेच्या खासदारांसह सामाजिक, पर्यावरण, उद्योग तसेच इतर क्षेत्रातील मिळून 11 सदस्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे संपुर्ण देशभरातून समितीत सात अशासकीय अशासकीय सदस्यांची निवड केली जाते. यापुर्वी राज्यातून माजीमंत्री मोहन धारीया यांनी या समितीवर काम केले आहे. समितीमार्फत पडजमीनी वनाचछादित करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे ही कामे केली जातात. शाळा, महाविद्यालये, उद्योगक्षेत्रे, आजी माजी सैनिक संघटना, खाजगी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व जनजागृतीचे काम केले जाणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment