संदेश कार्ले यांचा विकासकामे मार्गी लावण्यात हातखंडा : भगवान फुलसौंदर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

संदेश कार्ले यांचा विकासकामे मार्गी लावण्यात हातखंडा : भगवान फुलसौंदर

 संदेश कार्ले यांचा विकासकामे मार्गी लावण्यात हातखंडा : भगवान फुलसौंदर

बुरुडगाव हद्दीत बाबर मळ्याकडे जाणार्‍या सीना नदी पुलावर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्त्व आहे. एक सच्चा शिवसैनिक अशी त्यांची ओळख असून राजकारणापेक्षाही समाजकारणावर त्यांनी कायम भर दिला आहे. त्यामुळेच जनतेने त्यांच्या कायम प्रेम केले आहे. विकासकामे करताना कोणताही भेदभाव न करता झपाटल्यासारखी कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. बुरुडगाव रोडवरील बाबर मळ्याकडे जाणार्या पुलाचे काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लावून त्यांनी या परिसराला मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
बुरुडगाव रोडवरील सीना नदीवरील बाबर मळ्याकडे जाणार्या पुलाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून होणार्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी फुलसौंदर बोलत होते. कार्यक्रमास जि.प.सदस्य संदेश कार्ले, माजी सरपंच बापूसाहेब कुलट, रमेश बाबर, अनिल बाबर, दिलीप पाचारणे, किशोर कर्डिले, खंडू काळे, ज्ञानेश्वर चव्हाण, अक्षय चव्हाण, धीरज नन्नवरे, जालिंदर वाघ, अरूण शिंदे, पांडुरंग जाधव, जालिंदर कुलट, शाम पटवेकर, गंगाधर कदम, जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता शिवाजी राऊत, प्रदिप बरबडे आदी उपस्थित होते.
संदेश कार्ले म्हणाले की, बुरुडगाव हद्दीतील विविध समस्यांची नेहमीच प्राधान्याने सोडवणूक केली आहे. बाबर मळ्याकडे जाणार्या पुलाची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात या भागातील दळणवळण ठप्प होत होते. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून निधी मंजुर केला आहे. काँक्रिटीकरणाचे हे काम दर्जेदार होण्यासाठीही विशेष लक्ष दिले जाईल.

No comments:

Post a Comment