जागतिक महिला दिनानिमित्ताने, सकल मराठा सोयरीक ग्रुपची वधू-वर ऑनलाइन नाव नोंदणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्ताने, सकल मराठा सोयरीक ग्रुपची वधू-वर ऑनलाइन नाव नोंदणी

 जागतिक महिला दिनानिमित्ताने, सकल मराठा सोयरीक ग्रुपची वधू-वर ऑनलाइन नाव नोंदणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सोयरीक जमवण्यासाठी वधु-वर सुचक मंडळ व विवाह संस्थांकडून विवाह ठरवताना वधू-वरांच्या पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सकल मराठा सोयरीक डॉट कॉम ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च पासून सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक वधू-वरांसाठी सकल मराठा सोयरीक डॉट कॉम या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरू करण्यात येत आहे.सध्या राज्यात अनाधिकृत वधु-वर सूचक केंद्र,विवाह मंडळ,वैयक्तिक एजंट,चे अक्षरशा पेव फुटले आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. सध्या मुला मुलींच्या व पालकांच्या अपेक्षा जास्त वाढल्याने जे स्थळ पाहिले जाते त्या ठिकाणी निराशाच पदरी पडत असल्याने वधु-वर व त्यांच्या पालकांना शेवटी लग्न जमण्यासाठी वधु-वर सुचक केंद्र व विवाह संस्थाकडे जाण्याशिवाय पालकांना पर्याय राहत नाही आणि विवाह संस्था, वधू-वर सुचक केंद्र कडूनही अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी केली जाते.अलीकडच्या काळात लग्न जमवण्यासाठी वधू- वर सूचक,विवाह मंडळाचे पेव फुटले आहे. ऑनलाइन,ऑफलाइन जुळवण्याचे काम कारणार्‍या विवाह संस्था, वधु-वर सुचक केंद्रची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. अनुरुप स्थळे सुचवण्यासाठी आणि लग्न जमवतांना वधू-वरांच्या पित्याकडून मोठी आर्थिक मागणी होत आहे. त्यामुळे सकल मराठा सोयरीक डॉट.कॉम या सोशलमिडीया वरील ग्रृप ने राज्यातील काही समविचारी विवाह संस्थेला बरोबर घेऊन समाज बांधवाना  वधु-वर नाव नोंदणी ची सुविधा या पुढे घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करुन देण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा व मराठा उपजाती तील विवाहोत्सुक वधु-वर मंडळींना विवाहासाठी नाव नोंदणी प्रक्रियेसाठी वेळ दवडण्याची गरज नाही. जागतिक महिला दिनाच्या आठ मार्च पासून विवाहसाठी वधु-वर  नावनोंदणी केवळ ऑनलाइनच स्वीकारण्यात येणार आहे.त्यामुळे विवाहोत्सुक मंडळींना विवाहसाठी वधु-वर नाव नोंदणी प्रक्रियेसाठी वेळ,पैसा दवडण्याची गरज नाही.आठ मार्च पासून विवाहासाठी नाव नोंदणी  केवळ ऑनलाइनच स्वीकारण्यात येऊन संकेतस्थळावर समाजातील उच्चशिक्षित, नोकरदार, व्यवसायिक, उद्योजक, शेतकरी,वैद्यकीय क्षेत्रातील वधु-वरांची अनुरुप स्थळे उपलब्ध करुन दिली आहेत आहे.वधु-वर नोंदणीकरीता सध्या वधु-वरांच्या पालंकाना आणि वधु-वर यांना अन्य विवाह संस्थेच्या जिल्हा कार्यालयाकडे नोंदणी या कारणांसाठी प्रत्यक्ष जावे लागते.आता प्रक्रिया 8मार्च 2021पासून ुुु.ीरज्ञरश्रारीरींहरीेूीळज्ञ.लेा या लिंकवर ऑनलाइन नाव नोंदणी करण्याची पर्यायी व्यवस्था इन्फिनिटी सिस्टमचे इंजि.राजेश पाटील सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सकल मराठा सोयरीक डॉट कॉम या ग्रृपने राज्यातील काही समविचारी इतर वधु-वर सुचक केंद्र व विवाह संस्था यांनी एकत्र येऊन ना नफा .. ना तोटा.. ना एजंट या तत्वावर सुरू केली आहे.आज पर्यंत व्हाट्सअप ग्रृप च्या माध्यमातून फोटो व बॉयोडाटा देवान-घेवान होत होती. या व्हाटसअप ग्रृप च्या माध्यमातून सकल मराठा समाजातील हजारो वधु-वर यांचे विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्यामुळे त्यांचे संसार गुण्यागोविंदाने सुरु असल्याने समाजातील अनेक वधु-वर व पालकांचा नाव नोंदणीचा कल सकल मराठा सोयरीक डॉट कॉम या ग्रृप कडे वाढल्याने   दिवसेंदिवस ग्रृप संख्या वाढली जात असल्याने ग्रृप मधील सकल मराठा समाजाचे विविध माजी आधिकारी,पदाधिकारी, शासकिय निमशासकिय आधिकारी व कर्मचारी, मराठा समाजाच्या विविध संघटना,ग्रृप अ‍ॅडमिन यांच्या मार्गदर्शनाखाली  ुुु.ीरज्ञरश्रारीरींहरीेूीळज्ञ.लेा या संकेतस्थळाची निर्मिती करुन व अ‍ॅडमिन ने पालक व वधु-वरांशी सुसंवाद ठेऊन, आत्ता पर्यतचा कारभार पारदर्शक व कुठलाही अहंकार न ठेवता प्रामाणिकपणे  सुरू ठेवला असल्याने ग्रृपचे काम सेवाभावी वृत्तीने चालु असल्याने समाजातील वधु-वर व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन या पुढील नाव नोंदणी प्रक्रिया ऑनलाइनच करणे बंधनकारक राहील,असे सकल मराठा सोयरीक ग्रृपचे मार्गदर्शक विठ्ठलराव गुंजाळ,राजमाता जिजाऊ चित्रपटाचे निर्माते मंदाताई निमसे,सकल मराठा सोयरीक ग्रृप मुख्यअ‍ॅडमिन जयकिसन वाघपाटील यांच्या नियंत्रणाखाली ग्रृपचे समन्वयक लक्ष्मणराव मडके,सौ.देवयानी आहेर,सौ.गायत्री सोलाट, मराठा सोयरीकचे बाळासाहेब वाकचौरे,अशोकराव बनकर, राजमाता जिजाऊ मराठा वधु वर मंडळचे हरीभाऊ जगताप,राजेश सरमाने,धनंजय सांबारे,डॉ.एल.एच.झांबरे,बाळासाहेब भोर, सौ.मायाताई जगताप,रजनीताई गोंदकर,सौ.शितलताई चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या रोहिणीताई वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here