जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची नावे दोन्ही ‘हायकमांड’ कडून रात्रीच फायनल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 6, 2021

जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची नावे दोन्ही ‘हायकमांड’ कडून रात्रीच फायनल.

 जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची नावे दोन्ही ‘हायकमांड’ कडून रात्रीच फायनल.

अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे.
  1 मे 1958 रोजी स्थापन झालेल्या जिल्हा सहकारी बँकेने 63 व्या वर्षात पदार्पण केले असून बँकेचे 5 हजार 889 सभासद असून 108 वेयक्तिक सभासद आहेत. 5 हजार 248 कोटींच्या ठेवी, 4 हजार 50 कोटींचे कर्जवाटप 212 कोटींचे भाग भांडवल व ते 33 कोटींचा नफा मिळविलेल्या जिल्हा बँकेच्या 287 शाखा असून 10 विस्तार कक्ष आहेत. जिल्ह्याची “कामधेनु” म्हणून गौरव प्राप्त असणार्‍या या बँकेच्या गौरवात अ‍ॅड उदय शेळके व माधवराव कानवडे निश्चित भर पाडतील अशी आशा आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सहकार क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची निवड झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अजित पवार यांच्यातील चर्चेमधून अँड शेळके यांचे नाव निश्चित करण्यात आले. शेळके यांचा बँकिंग क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे. महानगर बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठा अनुभव आहे. शेळके हे वकील असल्याने जमेची बाजू असून प्रशासनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जवळचे समर्थक असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे जावई आहेत. मागील वेळी बँकेचे अध्यक्षपद उत्तरेत होते. यावेळी दक्षिणेचा अध्यक्ष, तर उत्तरेत उपाध्यक्ष देण्याबाबत दोन्ही हायकमांडचे एकमत झाल्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.जिल्हा बँकेच्या संचालकांची बिनविरोध निवडणुकीसाठी ना. बाळासाहेब थोरात व ना. अजित पवार या ‘हायकमांड’ ची भूमिका महत्त्वाची ठरली. व जिल्ह्यातील दुसरे हायकमांड ‘विखेपिता-पुत्र’ यांना या निवडणुकीत धक्का देण्याची व्युहनीती दोन्ही हायकमांडनी निश्चित केल्यानंतर ही भाजपाचे 7 संचालक निवडून आले. पण अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदासाठी “विखेहायकमांड” कोणताही अनपेक्षित धक्का देऊ शकले नाहीत. बँकेच्या निवडणूक प्रक्रिया पासून सुरू झालेली सहमती एक्सप्रेस अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या स्टॉप पर्यंत विना-अडथळे पोहचली असे म्हणता येईल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे उपस्थितीत नव्या संचालकांची बैठक होवून हायकमांडने फायनल केलेल्या अ‍ॅड शेळके व माधवराव कानवडे यांचे नावाची माहिती देण्यात आली. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड शेळके व उपाध्यक्षपदासाठी कानवडे हे दोनच अर्ज भरतील हे निश्चित करण्यात आले. संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते.
   जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या मारुतीराव घुले पाटील सभागृहात दुपारी 1 वाजता संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड शेळके व उपाध्यक्ष पदासाठी कानवडे यांचे दोनच अर्ज आले. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे संचालक सर्वाधिक असल्याने बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल ही अपेक्षा व्यक्त केली जात होती. शेवगाव-पाथर्डी चे माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेळके यांना पाठबळ व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले सह सर्व संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here