गरीबांना टोप्या वाटप करून जपला सामाजिक ‘स्नेहबंध’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

गरीबांना टोप्या वाटप करून जपला सामाजिक ‘स्नेहबंध’

 गरीबांना टोप्या वाटप करून जपला सामाजिक ‘स्नेहबंध’


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहे. अद्याप मे हीटचा तडाखा लांब असल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. उन्हाच्या झळांपासून संरक्षण व्हावे, यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने गरीबांना टोप्या वाटप करण्यात आल्या.
उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. भरदुपारी कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडताना उन्हापासून आपले संरक्षण करता यावे म्हणून स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी गरीबांना टोप्या वाटपाचे नियोजन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात भिंगार व नगर शहरातील डीएसपी चौकात करण्यात आली. आकाश निर्‍हाळी, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार आदी यावेळी उपस्थित होते. उष्णतेमुळे रस्ते ओस पडत असले तरी, सायंकाळी मात्र गारव्याच्या शोधात उद्याने, थंड हवेच्या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मार्च मध्येच ही स्थिती असल्याने मे हीटचा तडाखा कसा असेल याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

उन्हापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने टोपी वापरावी
  उन्हापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने टोपी वापरावी, शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, तसेच सकाळी किंवा सायंकाळी उशिरा कामांची विभागणी केली जावी व आवश्यक काम असेल तर डोक्याला रुमाल, टोपी वापरावी, असे आवाहन उद्धव शिंदे यांनी केले.No comments:

Post a Comment