उद्या रेल रोको आंदोलन ! ‘अहमदनगर - पुणे इंटरसिटी ट्रेन’साठी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

उद्या रेल रोको आंदोलन ! ‘अहमदनगर - पुणे इंटरसिटी ट्रेन’साठी...

 उद्या रेल रोको आंदोलन‘अहमदनगर - पुणे इंटरसिटी ट्रेन’साठी...

अहमदनगर-पुणे हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातुन मुंबई आणि पुण्याकडे जाणारे प्रवेशद्वार आहे. यामुळे या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. तसे पाहता अहमदनगर व्यवसायिक, शैक्षणीक आणि आरोग्य सेवेसाठी पुण्याच्या जास्त संपर्कात आहे. म्हणून दिवसागणिक यात मोठी वाढ झाल्यामुळे हा प्रवास कठीण आणि वेळ घेणारा होत आहे. अहमदनगर ते पुणे हा अडीच तासाच्या प्रवासाला चार ते पाच तास लागतात. गर्दीच्या वेळात हा प्रवास आणखी लांबू शकतो. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर दररोज 800 पेक्षा जास्त बसेस चालतात. खाजगी वाहनाची संख्या हजारोंच्या घरात आहे. या मार्गावर जवळपास वीस हजार प्रवासी रोज प्रवास करतात. सुट्यांच्या दिवसात हा आकडा 40 हजारच्या घरात जातो. अहमदनगर पासुन पुण्याकडे जाणारा इतर कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या सर्व वाहतुकीचा ताण अहमदनगर-पुणे रस्त्यावरच येत असल्यामुळे हा रस्ता फक्त ट्रफिक जॅमच नव्हे तर अपघाताचे देखील ठिकाण झाले आहे. वाहतुकीच्या प्रचंड दबावामुळे या परिसरात प्रदुषणात मोठी वाढ झालेली आहे. या समस्येवर प्रभावी उपाय ‘अहमदनगर-पुणे इंटरसिटी ट्रेन’ आहे. ही ट्रेन सुरु झाल्यास हजारोच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करतील व रस्त्यावरील ताण तसेच अपघात कमी होण्यास मदत होईल. इंटरसिटी ट्रेनचा हा प्रवास फक्त 2 तास 45 मिनिटाचा असेल व याचे भाडे मात्र 47 रुपये असेल. या ट्रेनमुळे प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि कमी खर्चात होणार असल्यामुळे व्यवसायीक, नोकरदार आणि विद्यार्थी देखिल अहमदनगर मध्येच राहून पुण्याला दररोज ये-जा करु शकतात. यामुळे अहमदनगरहून रोजगारासाठी होणारे हजारो लोकांचे स्थलांतर थांबू शकेन आणि पर्यायाने अहमदनगरचे आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक विकास होईल यात शंका नाही. या इंटरसिटी ट्रेन मुळे अहमदनगर पुण्याला जोडला जाईल आणि शहराच्या विकासाच्या नविन पर्वाला सुरूवात होईल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पुणे इंटरसिटी ट्रेन अहमदनगरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या 11 वर्षापासुन ‘अहमदनगर जिल्हा प्रवासी संघ’ सातत्याने प्रयत्न करीत असूनदेखील अद्यापपर्यंत ही ट्रेन सुरु होऊ शकलेली नाही. सर्व अडचणी दुर झाल्या असताना देखील रेल्वे प्रशासन ही ट्रेन सुरु करण्यात दिरंगाई करत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा प्रवासी संघाने उद्या दि. 13 मार्च 2021 रोजी ‘रेल रोको’ ची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख महानगरे इंटरसिटीने जोडण्यात आली त्यात मुंबई - नाशिक, पुणे - सोलापूर इंटरसिटीचा समावेश आहे. मग अहमदनगरचा समावेश होणे ही काळाची गरज आहे.
या कामात सर्वात मोठा अडथळा दौंड येथील कॉर्ड लाईनचा होता, त्याचे काम देखिल पुर्ण झालेले आहे. या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम देखिल पुर्ण झालेले आहे. वास्तविक पाहता आता ही इंटरसिटी ट्रेन सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही. प्रश्न फक्त रेल्वेच्या इच्छाशक्तीचा आहे. कारण या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे रेल्वेसाठी ही ट्रेन खुपच फायद्याची ठरणार आहे.
सध्या अहमदनगर - पुणे रेल्वे मार्गावर 18 ट्रेन चालतात. परंतु अधिकांश ट्रेन या रात्रीच्या वेळेत चालतात किंवा त्या लांब पल्ल्याची असल्यामुळे अहमदनगरच्या प्रवाशांसाठी त्यात अत्यंत कमी जागा असते. यामुळे अहमदनगर पासुन पुण्याकडे जाणार्या स्पेशल इंटरसिटी ट्रेनची नितांत आवश्यकता आहे. ही इंटरसिटी ट्रेन अहमदनगरहून सकाळी निघाल्यास अगदी कार्यालयाच्या वेळेत पुण्याला पोहचू शकेन तसेच कार्यालय सुटल्यावर रात्रीच्या जेवणासाठी माणूस घरी पोहचू शकेन. असा हा सुखद प्रवास निश्चितच अहमदनगरकरांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मोलाचे सहकार्य अहमदनगरमधील शेतकरी बांधवांना गुलटेकडी मार्केटयार्डात शेतीमालाच्या संदर्भात हि ट्रेन फायदेशिर रहाणार आहे.
अहमदनगर - पुणे इंटरसिटीसाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघ आणि इतर संघटना सातत्याने प्रयत्न करीत आहेत. सातत्याने पाठपुराव्यामुळेच या मार्गातील जवळपास सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने ही इंटरसिटी ट्रेने सुरु करण्याची आवश्यकता आहे. रेल्वेने देखिल आता कोणतीही कारणे ना दाखवता इच्छाशक्ती दाखवून या ट्रेनला हिरवी झंडी दाखवावी कारण की लोकांची सहनशिलता आता संपत आहे. या इंटरसिटी ट्रेन चा मुद्दा अहमदनगरकरांसाठी कळीचा झाला आहे. या मागणीने आता लोकचळवळीचे स्वरुप धारण केले आहे.

मागील 11 वर्षापासुन तत्कालीन रेल मंत्री मा. सुरेश प्रभू, मागील टर्म मध्ये मा.ना. पियुष गोयल, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, सोलापूर विभागाचे रेल्वे मॅनेजर अशा अनेक लोकांनी आश्वासन दिले, त्यास विद्युतीकरण संपल्यावर, तत्पश्चात कॉडलाईनचे काम झाल्यावर आणि मागील वर्षी दौंड येथे कॉर्ड लाईनवर रेल्वे स्थानक झाल्यावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नसल्याने जन आंदोलनाच्या माध्यमातून अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने पुढाकार घेतलेला असून, रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसाद, मेरा देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागरूक नागरीक मंच, हर दिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स फाऊंडेशन इत्यादी अनेक संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. या आंदोलनासाठी हरजितसिंग वधवा, अर्शद शेख, सुहास मुळे, कारभारी गवळी, अशोक सब्बन, धनेश बोगावत, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, विपुल शहा, संजय सपकाळ, अशोक कानडे, अजय दिघे, धनेश कोठारी, संजय वाळूंज, अभिजीत सपकाळ, सय्यद सलीम सहारा, संदेश रपारिया, सय्यद अन्सार, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आदि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here