उत्तम बोडखे यांचा सत्कार करून लेखनीला दिल्या शुभेच्छा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

उत्तम बोडखे यांचा सत्कार करून लेखनीला दिल्या शुभेच्छा.

 उत्तम बोडखे यांचा सत्कार करून लेखनीला दिल्या शुभेच्छा.

प्रचंड लोकप्रियतेचा अद्वितीय झुंजार पत्रकार!


‘विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरूभक्ती, असीम करुणा आणि मातृहृदयी वात्सल्य असलेल्या आणि लेखणीचा प्रचंड ध्यास घेत सुखदुःखांना व्यक्त करणार्‍या वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंञी धनंजय मुंडे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. रामकृष्ण रंधवेबापु, भागवताचार्य साध्वी सोनालीदिदी करपे महाराज, भागवताचार्य प्रतिक्षादिदि करडुळे, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, दिलीपदादा हंबर्डे, सतीषआबा शिंदे, झुंजारनेताचे संपादक अजितदादा वरपे, नावासी संपादक श्रीपती माने,झुंजारनेताचे संचालक आकाश वरपे, सौ.विशाखा वरपे, समाजसेवक विजय गोल्हार, धुळ्याचे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत,बुलढाणाच्या पोलीस अधिक्षक बजरंग बन्सोडे यांच्यासह सामाजिक,राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध ज्येष्ठ नेते ,कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना,पक्ष यांच्यावतीने सत्कार, सन्मान करत भावी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव पाहून बोडखे परिवारातील सदस्य अक्षरशः भारावून गेले...
10 मार्च 2021 हा दैनिक झुंजारनेताचे वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचा अभिष्टचिंतन दिन होता.खरं तर लॉकडाउनच्या या काळामध्ये कुठलाही सत्कार सन्मान न करता ईश्वराला नतमस्तक होत कोवीड 19 चे संकट लवकर दूर व्हावे..या प्रार्थनेसह बोडखे परिवार आपला वाढदिवस करण्याचे ठरवले होते परंतु सकाळपासूनच आष्टीशहर व तालुक्यातील नागरिक ,बीड  आणि नगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे शिक्षण समाजकारण धार्मिक आर्थिक वैचारिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समाजधुरीण आणि गुणी जणांनी भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून सत्कार सन्मान करून बोडखे परिवारांच्या या अफाट कार्यशक्तीला सत्कार आणि शुभेच्छा यांच्या माध्यमातून बळ दिले.या आपल्या कार्य कार्यकर्तृत्वाला निश्चित ऊर्जा देतात अशी भावना यावेळी वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे  यांनी प्रांजळपणे नमूद केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here