रक्तविघटन संदर्भात देखील 30 एप्रिल पर्यत कार्यवाही करण्याचे आदेश- महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

रक्तविघटन संदर्भात देखील 30 एप्रिल पर्यत कार्यवाही करण्याचे आदेश- महापौर वाकळे

रक्तविघटन संदर्भात देखील 30 एप्रिल पर्यत कार्यवाही करण्याचे आदेश- महापौर वाकळे

रक्तपेढीतील होलब्लड जमा करणेचे काम 15 दिवसात सुरू करणार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मनपाच्या कै.बा.देशपांडे दवाखान्यामधील रक्तपेढी विभागासाठी पूर्ण वेळ डॉक्टर,  टेक्निकल सुपरवायझर, लॅब टेक्निशियन उपलब्ध न झाल्यामुळे रक्तपेढीचे काम बंद अवस्थेत आहे. याबाबत यापूर्वी रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने बैठक घेवून रक्तपेढी मनपाच्या वतीने सुरू करण्याकरिता डॉक्टर, लॅब टेक्निशियन, सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यासाठी आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे रक्तपेढी सुरू करण्याकरिता खाजगी करणाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. परंतु रक्तपेढी खाजगीकरणाच्या माध्यमातून करण्यासाठी अडचणी आल्या. खाजगी करणाच्या माध्यमातून रक्तपेढी सुरू करून गोर गरिब रूग्णांना रक्तपिशवी कमी दरामध्ये उपलब्ध होईल हा त्यामागचा उद्देश होता.  शहरातील गोरगरिब रूग्णांची रक्त पिशवीची मागणी पाहता मनपाच्या वतीने रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. रक्तपेढी विभागाची मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी बैठक घेतली यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्यलेखाअधिकारी प्रविण मानकर, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. शेडाळे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, रक्तपेढी विभागासाठी आवश्यक असणारा स्टाफ उपलब्ध करून देण्यात येईल. लवकरात लवकर रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. रक्तपिशवी खाजगी ठिकाणी घेण्यास गोरगरिब रूग्णांना परवडत नाही. कोवीडचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पुन्हा रूग्णांना  रक्ताची आवश्यकता लक्षात घेता मनपाच्या वतीने लवकरात लवकर रक्तपेढी सरू करून रक्तपिशवी उपलब्ध होईल यादृष्टिने कार्यवाही होणे आवश्यक आहे.  याबाबत आवश्यक असणारा स्टाफ प्रशासनाने तातडीने नियुक्त करावा 15 दिवसात होलब्लड उपलब्ध होईल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच रक्तविघटनासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध असून त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफची नियुक्ती करण्याच्या सुचना त्यांनी बैठकीत दिल्या.
यावेळी आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, मनपाच्या वतीने रक्तपेढी सुरू करून गोरगरिब रूग्णांना रक्तपिशवी उपलब्ध करता येईल संबंधीत डॉक्टर लॅब टेक्निशियन आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येईल. रक्तपेढी पूर्ण क्षमतेने 30 एप्रिल पर्यत सुरू करण्याचे संबंधीतांना आदेश दिले. तसेच 15 एप्रिल पर्यत होलब्लड उपलब्ध होईल या दृष्टिने रक्तपेढी सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सद्यपरिस्थितीत मशिनरी कसे आहेत याबाबत 15 दिवसात मशिनरीची तपासणी करून घेण्यात यावी. रक्तपेढी मधून गोरगरिब रूग्णांना रक्तपिशवी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था यांनी रक्त संकलनाबाबत कॅम्प आयोजित करावेत मनपा त्यांना योग्य ते सहकार्य करेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here