कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन बाबत घेतला हा मोठा निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन बाबत घेतला हा मोठा निर्णय

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन बाबत घेतला हा मोठा निर्णयनगरी दवंडी


अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना सात दिवस बंद करण्यात येणार आहे. तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना व नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्कचा व सॅनिटायझऱचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व आस्थापनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीचे अधिकार ग्रामीण स्तरावर तहसीलदार यांना नगर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर मुख्याधिकारी यांना दिले जात असल्याचे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. हे अधिकारी १५ एप्रिल पर्य़ंत देण्यात आले असून कारवाईचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्य़ालयाला द्यावा,असेही आदेशात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here