मानवी जीवनामध्ये पाण्याला खुप मोठे महत्त्व- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

मानवी जीवनामध्ये पाण्याला खुप मोठे महत्त्व- आ. जगताप

 मानवी जीवनामध्ये पाण्याला खुप मोठे महत्त्व- आ. जगताप

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने एस.टी.स्टॅड येथे अरुणोदय जलकुंभाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर भरदुपारी कामानिमित्त जाणे ही असह्य झाले आहे. ग्रामीण भागातून नगरमध्ये कामानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते. विविध संस्थानी पुढे येऊन शहरामध्ये पाणीपोई सुरू करावे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याशेजारी सकारात्मक दृष्टीकोनातून आमदार अरूण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय जलकुंभ सुरू केला आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून अनेकांची तहान भागवण्याचे काम होणार आहे. मानवी जीवनामध्ये पाण्याला खुप मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी अरुणोदय जलकुंभाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले नगर सेवक डॉ. सागर बोरूडे आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष शहर जिल्हा वैभव ढाकणे, माजी नगर सेवक संजय चौपडा, संतोष लांडे, संभाजी पवार, साहेबान जहागिरदार, दिलदारसिंग बीर, संतोष ढाकणे, लंकेश चितळकर, राहुल नेटके, शुंभम बंब, तुका कोतकर, सचिन गागर्डे, संजय तवले, सागर गाणार, राधे दांगट, क्रषिकेश बागल, अनिकेत चव्हाण, ऋषिकेश गवळी, अतुल लवाडे, शरद सकर, संकेत कुर्रे, मळु गाडळकर, क्रषि खोंडे, अक्षय आडागळे अमित खाबकर, गणेश बोरूडे, आदी उपस्थित होते.
वैभव ढाकणे म्हणाले की, उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत असते. ग्रामीण भागातील नागरिकाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी आमदार अरूण काका जगताप यांच्या वाढदिवसांनिमित्त्त एस.टी.स्टॅड परिसरामध्ये अरुणोदय जलकुंभ सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment