गो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

गो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन

 गो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन


अहमदनगर ः
शहरात दरोरज करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने केलेल्या होळी मध्ये करोना व्हायरसच्या पोस्टर्सचे दहन करून अनोख्या पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. गौरीशंकर मित्रमंडळाच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरा समोर झालेल्या होळीत कार्यकर्त्यांनी परिसरातीरल कचरा, मोडक्या लाकडी वस्तूंचे दहन करताना करोनाच्या पोस्टर्सचेही दहन केले. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी गो करोना गो... च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, गेल्या एका वर्षापासून आलेला करोना आता पुन्हा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशा परिस्थिती सर्वांनी स्वतः बरोबरच आपल्या घरातील लोकांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गौरीशंकर मित्रमंडळ दरवर्षी होळीच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम राबवत आहे. लवकरात लवकर संपूर्ण जग करोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करत यावर्षी होळीत करोना व्हायरसच्या प्रतिमांचे दहन केले आहे. यावेळी गौरीशंकर मित्रमंडळाचे सदाभाऊ शिंदे, सागर शिंदे, सुरज शिंदे, महेश साळी, अरिहंत शेलार, सचिन शिंदे, शुभम शिंदे, महेश कापरे, अथर्व शिंदे, ऋषिकेश शिंदे, अभिषेक शिंदे आदींसह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment